जळगाव (प्रतिनिधी) धार्मिक भावना दुखावतील असा मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी जळगाव येथील नामांकित मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील न्हावी येथील एक तरुण शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. दि. ११ जुलै रोजी त्याने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर धार्मिक भावना दुखावतील असा वादग्रस्त आणि अश्लील मजकूर पोस्ट करीत तो व्हायरल केला. ही बाब लक्षात येताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोकॉ मंदार पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून या विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोर मोरे हे करीत आहेत.