जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ११८३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ९९५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज तेरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २७४, जळगाव ग्रामीण-१२, भुसावळ- १४३, अमळनेर-८८, चोपडा-१९५, पाचोरा-१५, भडगाव-१०, धरणगाव-६९, यावल-३२, एरंडोल-१२२, जामनेर-४१, रावेर-३६, पारोळा-४८, चाळीसगाव-२८, मुक्ताईनगर-४७, बोदवड-२१, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण ११८३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ८१ हजार ९६९ पर्यंत पोहचली असून ६९ हजार ९७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज तेरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १५३९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०४५४ रुग्ण सध्या उपचार घेताय.