धरणगाव प्रतिनिधी । ज्ञानवंतांची आणि गुणवंतांची परंपरा असलेल्या धरणगावच्या शतकोत्तरी पी. आर.हायस्कूल शाळेने असंख्य विद्यार्थी घडविले आहेत. या शाळेचे माजी विद्यार्थी देश विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. याच शाळेतील २००७ च्या बॅचचा माजी गुणवंत आदर्श विद्यार्थी तथा पी. आर. हायस्कूल सोसायटीचे मानद सचिव डॉ. मिलिंद डहाळे यांचा सुपुत्र डॉ. सिद्धांत मिलिंद डहाळे याने एम.डी. (मेडिसिन) नंतरच्या डी. एम. शिक्षणासाठी लागणार्या नीट या राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षेत देशात ४० सावी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले. शाळेच्या वतीने त्याचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक एस.एम.अमृतकर याच्या हस्ते करण्यात आला.
उपमुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी पेढा भरवून सत्कार केला.या प्रसंगी पर्यवेक्षक आर.के.सपकाळे, ज्येष्ठ शिक्षिका सौ. ए. सी. शिरसाठ,ज्येष्ठ शिक्षक बी.डी.शिरसाठ, एनसीसी मेजर डी.एस.पाटील,सी.ए.शिरसाठ, एस.डी.मोरे,पी.डी.माळी,आर.जे.धनगर आदि शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डी. के. चौधरी यांनी केले.