TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाश्रमदान कार्यक्रमातून ‘स्वच्छतेचा जागर, शोषखड्डाचा करू वापर’ अभियानास सुरुवात !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महाश्रमदान कार्यक्रमातून ‘स्वच्छतेचा जागर, शोषखड्डाचा करू वापर’ या अभियानास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज ग्रामपंचायत चांदसर, तालुका धरणगाव येथे सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, एरंडोलचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, गटविकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, नागरीकांनी स्वच्छतेचे महत्व जाणल्यानेच आपण कोविडचा प्रादुर्भाव रोखू शकलो. जिल्ह्यात कोविड काळातही आरोग्यदूत, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने स्वच्छतेला प्राधान्य दिले. महात्मा गांधीजींचा स्वच्छतेचा संकल्प प्रत्येक नागरीकांने यापुढील काळातही मनाशी करुन आपले घर आणि परिसर अधिकाधिक स्वच्छ राहील यासाठी स्वत:हून प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कोणत्याही चांगल्या कामात लोकसहभाग असेल तर कामे अधिक दर्जेदार होऊन गावाची प्रगती होते. याचे उदाहरण म्हणजे चांदसर हे गाव असून याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे आणि सरपंच सचिन पवार यांचे कौतुक केले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या मनोगतात आरोग्याची पंचसूत्री सांगून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच ई-पीक पाहणी, पीक पेरा व सातबारा याबद्दल माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन शेतकऱ्यांना सातबाराचे वाटपही करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी या ‘स्वच्छतेचा जागर, शोषखड्डाचा करू वापर’ या अभियानाचे महत्त्व सांगितले. तसेच येत्या १०० दिवसात करावयाच्या कामांचे नियोजन सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. नंतर ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलेल्या अंगणवाडी सुशोभीकरण कामाची पाहणी केली. आपल्या मनोगतात सरपंच सचिन पवार यांनी जिल्ह्यातील पहिली वातानुकूलित अंगणवाडी सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी केले. सूत्रसंचलन क्षमता बांधणी तज्ञ मनोहर सोनवणे यांनी तर उपस्थितांचे आभार गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी, मुख्याध्यापक यांनी मेहनत घेतली.

‘स्वच्छतेचा जागर, शोषखड्डाचा करू वापर’ अभियानाची वैशिष्टे

या अभियानामध्ये जिल्हाभरात प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पुढील १०० दिवसात ५० शोषखड्डे तसेच मागणीप्रमाणे खताचे खड्डे याचे बांधकाम लोकसहभाग, १५ वा वित्त आयोग, मनेरेगा आशा विविध योजनांमधून करण्यात येणार आहेत. प्रति तालुका २५ घनवन प्रकल्प साकारणार आहेत तसेच घरातील प्लास्टिक घरातील कुंडी किंवा रिकाम्या डब्ब्यात भरून ठेवून नंतर ग्रामपंचायतस्तरावर त्याचे संकलन करण्यात येणार आहे. तसेच १६ कलमी कार्यक्रमातंर्गत प्रत्येक शाळा, अंगणवाडी यांना सुलभ शौचालय, वीज जोडणी, परसबाग, पिण्याच्या पाण्याची सुविधा, डिजिटल शिक्षण आदि बाबीचा समावेश असणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

मुंबईतील महिलेवर अत्याचार, आध्यात्मिक बाबाला बेड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण करणारे नेत्रतज्ज्ञ डॉ. नि. तु. पाटील आयएमएच्या वतीने सत्कार !

September 18, 2023

नेहरुंच्या ‘त्या’ भाषणामुळेच अर्थव्यवस्था बिघडली : भाजप नेते विश्वास सारंग

August 2, 2021

खडसे बरसले : नाव न घेता ‘या’ दोन नेत्यांवर केली टीका !

July 31, 2022

मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशाची जनता आतूर : आमदार मंगेशदादा चव्हाण !

May 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group