धरणगाव (प्रतिनिधी) सालाबादा प्रमाणे ह्या वर्षीय श्रावण महिन्यात दर मंगळवारी मरीआई मंदीर परीसरात यात्रा उत्सव होत असून त्यात तालुका व शहर परिसरातील असंख्य भाविक सहभागी होतात. त्या निमित्ताने दर मंगळवारी सायंकाळी पाच ते रात्री सात वाजेपर्यंत व्यायाम प्रसारक मंडळचा वतीने कुस्तीचा आखाडा लागतो. त्यात जिल्हासह राज्यातील विविध नामांकित पहेलवान सहभागी होतात. तरी सदर कार्यक्रमात परीसरातील असंख्य नागरीकानी सहभागी व्हावे,असे आवाहन मरीआई संस्थाचे अध्यक्ष किशोर महाजन व व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भानुदास विसावे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सदर श्रावण महिन्यात चार मंगळवार मरी आईची मोठी यात्रा भरते. यात्रेत व्यायम प्रसारक मंडळाच्या वतीने कुस्त्याच्या कार्यक्रम चांगल्या प्रकारात होतो. कुस्त्या खेळण्यासाठी महाराष्ट्रातून नामांकित पैलवान कुस्ती खेळण्यात येतात. तसेच यात्रेमध्ये पाळणा घरे व बहुतेक व्यापारी यात्रेमध्ये दुकाने लावून यात्रेचे स्वरूप वाढवतात. हे मंदिर कमीत कमी 200 वर्ष जुने असून यावर्षी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आलेला आहे. मंदिराची शोभा वाढवण्यासाठी मंदिराचे ट्रस्ट व अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांची कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत सुरू असते. देखरेखेसाठी सदैव तत्पर असते. या मंदिरासाठी नेहमी मेहनत करणारे सर्व मरी माता संस्थांचे संचालक मंडळ मेहनत घेत असते. मंदिर तसे जुने असून वडार समाज व वैदु समाज यांची कुलदेवता असल्यामुळे मंदिरात बाराही महिने महाराष्ट्रातून नवस फेडण्यासाठी लोक येत असतात. मरी माता धरणगावची ग्रामदैवत असून गावातील सर्व समाज बांधव श्रावण महिन्यात वाजत गाजत पूजा देण्यासाठी येत असतात.