TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बहाण्याने बाहेर नेत पतीने केला पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का ; आरोपी पतीसह तिघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) आजारी पत्नीला कंटाळून एका पतीने थेट गळा चिरून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दि. १४ नोव्हेंबर रोजी एका अज्ञात महिलेचा मृतदेह नवीन गुमगाव येथील शेतात सापडला होता. तपासादरम्यान मयत महिलेच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. सावित्री पटले (वय ४२) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिचा पती देवराम (वय ४७) याच्यासह त्याचे सहकारी राजू चौधरी (वय ४४, बालाघाट) व मुन्ना ऊर्फ मुनीर शेख (वय ५१, मकरधोकडा) यांना अटक केली आहे.

शेतात रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता मृतदेह !
मुख्य आरोपी पती देवराम हरिश्चंद्र पटले, तर राजू उर्फ रामा बालाराम चौधरी, मुनिर अजगर शेख, अशी आरोपींची नावे आहेत. मृतक व आरोपी पती दोघेही मूळचे रावणवाडी, गोंदिया येथील रहिवासी आहेत. त्यांना एक १७ वर्षांची मुलगी व १९ वर्षांचा मुलगा असून दोघेही रावणवाडी येथे नातेवाइकांजवळ राहतात. दोन महिन्यांपूर्वी देवराम हा पत्नी सावित्रीला घेऊन नागपुरातील बुटीबोरीला कामाच्या शोधात आला होता. ही खुनाची घटना १३ नोव्हेंबर रोजी रात्री घडली होती. दुसऱ्या दिवशी १४ तारखेला दुपारी दोन वाजता उघडकीस आली. हिंगणा हद्दीतील गुमगाव- वडगाव समृद्धी मार्गावरील एका शेतात एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. घटनेची माहिती शेतमजुरांनी हिंगणा पोलिसांना दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

मानसिक संतुलन ढासळल्याने केला खून !
देवराम हा पत्नी सावित्रीसह गोंदिया रावणवाडीवरून दोन महिन्यांपूर्वी नागपुरात आला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, पत्नी सावित्रीचे वर्ष २००९ पासून मानसिक संतुलन ठीक नव्हते. त्यामुळे सततच्या त्रासामुळे तो त्रस्त झाला होता. एवढेच नव्हे तर पत्नीमुळे त्याला भाड्याची खोलीसुद्धा सोडावी लागली होती. परिसरातील नागरिकांनासुद्धा ती त्रास द्यायची. शेवटी देवरामने कायमच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी हत्येची योजना आखली. १३ नोव्हेंबरला पत्नीला दुचाकीवर बसवून समृद्धी मार्गावर आणले. सोबत त्याचे दोन मित्रसुद्धा दुसऱ्या मोटारसायकलने त्यांच्या पाठीमागे होते. येथे रस्त्याकडील भागात पत्नीला नेले आणि निर्जनस्थळी मित्रांच्या मदतीने तोंड दाबून ब्लेडने गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली.

असा झाला खुनाचा उलगडा !
पोलिसांनी मृतक महिलेचे फोटो इतर पोलीस ठाण्यात पाठविले होते. तर आरोपीने पत्नी सावित्रीच्या नातेवाइकांना ती पळून गेल्याचे सांगितले होते. त्या नातेवाइकांचा संशय बळावला. त्यांनी आरोपीला तिची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यास सांगितले. तब्बल चार दिवसांनी १७ तारखेला त्याने बुटीबोरी ठाण्यात जाऊन मृत पत्नीची मिसिंग तक्रार दाखल केली होती. दरम्यान, पोलीस त्या महिलेच्या शोधात होतेच. या मिसिंग महिलेचे वर्णन मृतक महिलेशी जुळत असल्याने पोलिसांनी आरोपीला संपर्क केला. त्यानंतर आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देत स्वतः गोंदिया येथे असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सोमवारी दुपारी गोंदिया येथून त्याला ताब्यात घेतले. त्यांनी आरोपीची आणखी चौकशी केली असतात्याने दोन साथीदारांची नावे सांगितली. त्यावरून दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. आरोपीला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो प्तनीला मारहाण करायचा. त्याने व्यसनापायी घरदारसुद्धा विकले. नेहमीच्या भांडणाला कंटाळून दोन्ही मुले आपल्या मावशीकडे राहत होती. रोज दारू पिऊन घरी येत असल्याने पत्नीसोबत भांडण व मारहाण आरोपी करीत होता. मृतक ही वेडसर नव्हती, असेही नातेवाइकांनी सांगितले.

घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं !
ठरलेल्या प्लॅननुसार १३ नोव्हेंबर रोजी देवराम नातेवाइकांना गावी जाऊन भेटण्याच्या बहाण्याने सावित्रीला दुचाकीने घेऊन निघाला. राजू चौधरी आणि मुन्ना शेख हेही दुसच्या दुचाकीवर होते. आरोपी सावित्रीला घेऊन हिंगणा येथील घटनास्थळी पोहोचले. तेथे ब्लेडने सावित्रीचा गळा चिरून खून केल्यानंतर देवराम साथीदारांसह फरार झाला. देवरामने सावित्रीच्या घरच्यांना बोलावून ती अचानक गायब झाल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी त्याला पोलिसांत तक्रार देण्यास सांगितल्यावर देवरामने टाळाटाळ सुरू केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

साहित्य संमेलनात वाचक, साहित्यिक, प्रकाशक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे : आयुष प्रसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात शाळेच्या संस्था चालकास मारहाण; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

January 23, 2021

जातीवाचक शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

May 7, 2025

चिंताजनक : देशात २४ तासांत आढळले २,६१,५०० कोरोनाबाधित ; १५०१ जणांचा मृत्यू

April 18, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, गुरूवार २९ जून २०२३ !

June 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group