TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संसदेची सुरक्षा पुन्हा एकदा भेदली, प्रेक्षक गॅलरीतून दोघांच्या लोकसभेत उड्या !

सभागृहात केला पिवळा धूर ; जाणून घ्या...संसदेत नेमकं काय घडलं !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2023
in गुन्हे, राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून अचानक खाली उडी मारल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. दरम्यान, घोषणाबाजी करणारा आणि संसदेच्या सभागृहात पिवळा धूर करणाऱ्या तरुणाचं अमोल शिंदे असं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. अमोल याच्या लातूर जिल्ह्यातील नवकुंडझरी गावात पोलीस आता चौकशीसाठी दाखल झाले आहेत.

लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरुण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले आणि त्यांनी टेबलावरुन सभापतींच्या खुर्चीकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाचे स्मोक कँडलही फोडले. यावेळी खासदार हनुमान बेनिवाल, मनोज कोटक, मलूक नागर यांच्यासह काही खासदारांनी त्या आरोपींना पकडले. यावेळी खासदारांनी आरोपीला बेदम चोपही दिला.

READ ALSO

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

याप्रकरणी अटक करण्यात आलेला अमोल धनराज शिंदे हा तरुण महाराष्ट्रातला आहे. अमोल मूळचा लातूरच्या चाकूर तालुक्यातील नवकुंडझरी गावचा राहणारा आहे.. संसदेत दोघा तरुणांनी प्रेक्षक गॅलरीत उडी मारली… तर दोघांनी संसदेच्या आवारात निदर्शनं केली. स्मोक कँडलमधून त्यांनी धूर सोडला. त्यामध्ये अमोलचा समावेश होता. या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी अमोल शिंदेला तत्काळ अटक केली. तो दिल्लीला का गेला? तिथे त्याचे नेमके काय काम होते? त्याच्यासोबत कोण – कोण होते? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

याप्रकरणी पोलीस अमोल शिंदेच्या घरी दाखल झाले असून अमोल शिंदेच्या आई-वडिलांची चौकशी सुरू झालीय. लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील नवकुंडझरी गावातल्या घरी जाऊन पोलिसांनी कसून चौकशी सुरू केलीय. दरम्यान, अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करत होता. तो कुटुंबिय आणि गावापासून दूर राहत होता. तो गेल्या 15 दिवसांपूर्वी दिल्लीला जातो असं आई-वडिलांना सांगून निघून गेला होता.

आरोपींमध्ये सागर शर्मा(रा. लखनौ, उत्तर प्रदेश), अमोल शिंदे(रा. लातूर, महाराष्ट्र), नीलम सिंह(रा. हरियाण), मनोरंज गौडा(रा.म्हैसूर, कर्नाटक) यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत आणखी कोण कोण होते, याचा शोध घेतला जातोय. दिल्ली पोलीस आणि आयबी आरोपींची चौकशी करत आहे. दरम्यान, खासदार प्रताप सिम्हा यांच्या शिफारशीनं संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना पास मिळाले होते. हे खासदार प्रताप सिम्हा कर्नाटकातील म्हैसूरचे खासदार आहेत. त्यांचं वय ४२ वर्षे असून ते भाजपचे खासदार आहेत.

आजच्याच दिवशी 13 डिसेंबर 2001 रोजी संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी लोकसभेत झालेल्या सुरक्षेतील त्रुटींमुळे अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, आज घडलेली घटना आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब असून ही घटना अत्यंत गंभीर आहे. याची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून त्यानुसार कारवाई केली जाईल. सभागृहातील सुरक्षेबाबतही सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे त्यांनी सभागृहाचे कामकाज गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
Next Post

आपत्कालीन सेवेने नऊ वर्षांत वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ : बारा हजाराची लाच स्वीकारतांना कोतवालासह पंटर एसीबीच्या जाळ्यात !

April 18, 2023

नवलच ! बकरीच्या पोटी जन्माला आलं माणसासारखं पिल्लू, बघून सर्वच झाले हैराण

December 29, 2021

घरामध्ये कपडे बदलवीत असताना महिलेचा विनभंग ; जळगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

September 12, 2022

जळगावमध्ये रिलायन्स पेट्रोल पंपासमोर लोकसंघर्ष मोर्चासह विविध जनसंघटनांची निदर्शने !

December 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group