धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी गावाजवळील पोखरी फाटा जवळ मोटारसायकल समोरासमोर धडकल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात मोटर सायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. ७ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी जवळील पोखरी फाट्याजवळ मोटारसायकल क्रमांक जी.जे. ०५, एम.डी. ३७८८ वरील चालकाने भरधाव वेगाने चालवून मोटासायकल क्रमांक एम.एच. १९ बी.के. ५१४३ हिस समोरून ठोस मारल्याने धनराज पंढरीनाथ नन्नवरे (वय ४२, रा. बांभोरी प्र.चा.ता. धरणगाव) यांचा मृत्यू झाला. तर नवल पंडित नन्नवरे (रा. बांभोरी) हे जखमी झाले. याप्रकरणी मनोहर पंढरीनाथ नन्नवरे (वय ३५, बांभोरी प्र.चा.ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्थानकात मोटार सायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो हे कॉ विजय चौधरी हे करीत आहेत.