TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑनलाईन महात्मा गांधी जयंती साजरी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2020
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या व लाल बहादुर शास्त्री यांच्या 116 व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ऑनलाईन महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, संचालिका ज्योती जैन, अंबिका जैन, गिता धर्मपाल, डॉ. जॉन चेल्लादूराई प्रत्यक्ष हजर होते. तर महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी, ज्येष्ठ गांधीयन डॉ. सुदर्शन अय्यंगार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यात आले. दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. अनुभूति इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक निखील क्षिरसागर, श्री. सारंग यांनी गांधीजींना प्रिय असलेले वैष्णव जन..हे भजन म्हटले. गांधी रिसर्च फाऊंडेशन व त्यांचे गांधी विचार प्रचार प्रसाराचे कार्यविस्तार याविषयी सौ. अंबिका जैन यांनी प्रास्तविक करताना सांगितले. ऑनलाईन पद्धतीने गांधी विचार आजच्या कठिण काळातही किती महत्त्वपूर्ण आहेत हे डॉ. अनिल काकोडकर, तुषार गांधी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, अशोक जैन यांनी विशद केले. सौ. ज्योती जैन यांनी विश्व अहिंसा दिनानिमित्त उपस्थितांना अहिंसेचे प्रतिज्ञा दिली. गांधी तीर्थ लवकरच व्हर्चुअल होत आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्हर्चुअल टूर साठी टिझर लॉंच करण्यात आला. आश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले.

READ ALSO

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

गांधी विचारातूनच सध्याचे संकट कमी करता येईल- डॉ. अनिल काकोडकर
सध्या कोव्हीड-19 च्या संकटामुळे अनेक जण बेरोजगार झाले त्यामुळे स्थलांतरही वाढले. ही वस्तुस्थिती असताना संतुलीत ग्रामिण व्यवस्था निर्माण करण्याचे गांधीजींचे स्वप्न आज किती महत्त्वपूर्ण ठरले असते ह्याची जाणिव होते. महात्मा गांधीजींच्या ग्रामस्वराज्यावर भर देणारे विचार आजही शाश्वत आहे. महात्मा गांधीजींच्या विचार व संस्कारांवर चालले तर एक स्वस्थ व संतुलीत भारत घडविता येईल यासाठी गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर चालणे महत्त्वाचे आहे असा संदेश डॉ. अनिल काकोडकर यांनी दिला.

एकांतवास म्हणजे तपस्या – तुषार गांधी
महात्मा गांधीजींनी येरवडा तुरंगाला मंदीर म्हटले कारण त्याठिकाणी राहून बंदीवासातील वेळेचा उपयोग त्यांनी ज्ञानात भर घालण्यासाठी केला. एकांतवास म्हणजे स्वतला जागृत करणे अशी त्यांची धारणा होती. लिखाण, वाचनासह जे जे चांगले करता येईल याचा विचार केला त्यामुळेच चांगले जगता आले. सध्या कोव्हीडमुळे आयसोलेशन व्हावे लागते परंतू महात्मा गांधीजींच्या एकांतवासाच्या विचारांतून प्रेरणा घेतली तर स्वस्थ भारत घडू शकतो असा संदेश महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी दिला.

गांधीजींच्या विचारांतूनच भवरलालजींनी कृषी संस्कृतीत केले परिवर्तन- डॉ. सुदर्शन अय्यंगार
‘महात्मा गांधी यांच्या तत्त्वांवर आधारित भवरलालजी जैन यांची विचार सृष्टी’ या विषयावर ज्येष्ठ गांधीयन डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सध्याची परिस्थीती कठिण असली तरी हिम्मत आणि धैर्याने काम केले तर यावर मात करता येईल. अनेक कठिण काळात महात्मा गांधीजींचे मुल्य जपणे म्हणजे साधारण कार्यातून सामाजिक दायित्वासह असाधारण कार्य करणे होय. हे कार्य भवरलालजी जैन यांनी केले. व्यक्ती, समाज आणि सृष्टी यांच्यात परिवर्तन घडविण्याचे काम भवरलालजी जैन यांनी कृषी संस्कृतीला विज्ञानाची जोड देत केले. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान दिले. यातून गांधीजींच्या ग्रामिण अर्थ स्वातंत्र्याचा मुलमंत्र जपला गेला. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, बंधुता, न्याय ह्या गांधीजींनी सांगितलेल्या जीवनमूल्यांवरच भवरलालजी जैन यांनी कार्य केले. भवरलालजी जैन यांनी संस्कारित केलेला अपरिग्रहाचा वारसा जैन परिवार व जैन परिवारातील प्रत्येक सदस्य जपत असल्याचाही उल्लेख डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केला.

महात्मा गांधीजींचे विचार शाश्वत- अशोक जैन
प्रासंगिक संदेश देताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन म्हणाले की, बदलत्या जीवनशैली व सद्यपरिस्थितही महात्मा गांधीजींचे विचार शाश्वत आहेत. संकटाची परिस्थिती आहे मात्र हताश, निराश न होता नैतिक मुल्ये जपत सामाजिक दायित्वाची जबाबदारी घेत पुढे चालत राहणे म्हणजे गांधी विचारांवर मार्गक्रम करणे. हा प्रयत्न वडिल भवरलालजी जैन यांनी केला. तोच प्रयत्न जैन परिवार करित आहे. गांधी विचारातुनच देशातील उत्पादकांचा भूमिपुत्रांना लाभ व्हावा यासाठीच जैन इरिगेशन प्रयत्न करित असल्याचे अशोक जैन म्हणाले.

चरखा जयंतीनिमित्त अखंड सूतकताई
महात्मा गांधी जयंती ला चरखा जयंती म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनच्या प्रांगणात दिवसभर अखंड सूतकताई करण्यात आली. यामध्ये फाउंडेशनचे सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026
जळगाव

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जून 2026 !

June 29, 2026
Next Post

केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्याला देशातून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डीआरडीओच्या 2-DG कोरोना प्रतिबंधक औषधाला DGCIची परवानगी

May 8, 2021

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला

September 18, 2020

काबुलहून भारतात परतलेल्या ७८ जणांपैकी १६ जणांना कोरोना !

August 25, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ७ कोरोनाबाधित, २३ झाले बरे !

July 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group