मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यानंतर राजकीय हालचालीना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. राजकारणात अनेक बैठकींचे सिललिले सुरुच आहेत. राजकीय संकट आणि शिवसेना तुटण्याच्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेच्या बड्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. तर आज शिवसेनेने बोलविल्या बैठकीला फक्त १८ आमदार वर्षा बंगल्यावर उपस्थित झाले आहे.
उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. परंतु नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री हजर होते. बैठकीत राजीनाम्याबद्दल शब्द देखील काढलेला नाही. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सराकरला कोणताच धोका नसल्याचे सांगितले आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात घट्ट मैत्रिचे नात असल्याचे बोलले जाते. मात्र, . शिंदे यांनी ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. यातील ३८ शिवसेनेचे तर ७ अपक्ष आमदार असल्याचे म्हटले जात आहे.
हे १८ आमदार बैठकीत उपस्थित
१) आदित्य ठाकरे २) सुनील प्रभू ३) राजन साळवी ४) वैभव नाईक ५) नितीन देशमुख ६) उदय सामंत ७) सुनील राऊत ८) रवींद्र वायकर ९) दिलीप लांडे १०) राहुल पाटील ११) रमेश कोरगावकर १२) प्रकाश फातर्पेकर १३) उदयसिंह राजपूत १४) संतोष बांगर १५) अजय चौधरी १६) कैलास पाटील १७) संजय पोतनीस १८) भास्कर जाधव