TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘विरोधी पक्षाच्या आरोपांना सडेतोड उत्तर देणं गरजेचं’ : संजय राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) ‘महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांचे सरकार चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विरोधी पक्ष सरकारची प्रतिमा बिघडवण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत. या सगळ्या आरोपांना सडेतोड उत्तर देणे गरजेचं आहे. नाहीतर विरोधी पक्षाचा खोटेपणा रोज रोज ऐकून लोकांना एक दिवस खरा वाटू लागेल,’ अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला सल्ला दिला आहे.

‘सामना’तील रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी हे विचार मांडले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात १४ मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले. पण तेव्हा नैतिकतेने सत्तेशी जणू लव्ह जिहाद पुकारला होता. मात्र, सध्याच्या घडीला विरोधी पक्ष सरकारची प्रतिमा बिघडवण्याची एकही संधी सोडत नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

संजय राऊत यांनी शासकीय महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीवरून सरकारचे कान उपटले आहेत. राज्यपालांनी अद्याप १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्त्या केल्या नाहीत, ही बाब खरी आहे. पण दीड वर्ष उलटूनही सरकारने शासकीय महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्यपदी तज्ज्ञ आणि आपापल्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केलेल्या नाहीत, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या वक्तव्याचा दाखला दिला आहे. शपथ घेतल्या दिवसापासून आघाडी सरकार सापाला दूध पाजतंय. आम्ही सांगून थकलो. आजपर्यंत कायदा विभागातील एक साधा वकील बदललेला नाही. एक नोकर दोन तत्वत: मतभिन्नता असलेल्या मालकाची प्रामाणिकपणे सेवा कशी करु शकतो?, असा प्रश्न कोळसे-पाटलांना पडला असेल तर सरकारने त्याचे समाधान करायला हवे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

संजय राऊत यांनी नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या भूमिकेचे समर्थन केले. वळसे-पाटलांनी गृहखात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हटले होते की, पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्ठा नक्की कोठे आहेत, हे तपासून घ्यावे लागेल. हे फक्त विधी, न्याय आणि गृहखात्यापुरते नाही, तर संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे गरजेचे आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.

‘१०० कोटींच्या वसुलीचा आरोप पदावरून हटवलेला एक माजी पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांवर करतो व त्या आरोपावर आपली न्याय व्यवस्था सरळ ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश देते. म्हणजे महाराष्ट्रातील एखाद्या प्रकरणाचा तपास राज्याबाहेर न्यायचा व सरकारच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवायची. महाराष्ट्रातच एखाद्या निवृत्त हायकोर्ट जजकडूनही या संपूर्ण प्रकरणाचा तपास करता आला असता, पण महाराष्ट्रात हायकोर्टाच्या आदेशाने सीबीआयला आणले गेले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचा तपास सीबीआयने १५ दिवसांत करायचा आहे व अहवाल हायकोर्टालाच द्यायचा आहे. मग आता याच पद्धतीने देशभरातील इतर आरोपांचा तपासही करणार काय?,’ असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुगलने वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी बनवले खास डूडल

March 20, 2021

हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या संशयितावर एमआयडीसी पोलीसांची कारवाई !

July 22, 2024

पत्रकार सुर्यकांत कदम “पत्रकार रत्नम” राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

October 5, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group