पाचोरा (प्रतिनिधी) एका चाळीस वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलाला दारू पाजत दारूच्या नशेत त्याच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत पिडीत मुलाकडून संबंधित महिलेने पैसे देखील उकळले आहेत. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात महीलेसह चार जणांविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या काळात मार्च २०२० ते २० नोव्हेंबर २०१३ या काळात ही घटना घडली होती. १७ वर्ष ७ महिने वयाचा हा मुलगा मार्च २०२० मध्ये लॉकडाउन लागल्यानंतर मुल्गावी सहपरीवार आला होता. तेथे तो मित्रासोबत राहू लागला. मित्राच्या घरी जाणे-येणे सुरू झाले असता त्याला एकेदिवशी दारू पाजण्यात आली. दारूच्या नशेत असताना मित्राच्या नात्यातील महिलेने बळजबरीने शारिरीक संबंध करण्यात भाग पाडले, व त्याचा व्हीडीओ बनविण्यात आला. यानंतर ५० हजार रूपये आणून दे, नाहीतर व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी देण्यात आली. तेव्हा त्या मुलाने घरातून पैसे व दागिने आणून दिले. परंतू दोन वेळा असेच घडल्यानंतर पिडीत मुलाने वडीलांना माहीत दिली.