कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) परिसरातील एका गावातील तरुणीला आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्की उर्फ मनोहर बापुराव पाटील (वय २८), असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात पिडीत तरुणीने कासोदा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २७ सप्टेंबर २०२१ ते ११ फेब्रुवारी २०२३ च्या दरम्यान, संशयित आरोपी विक्की उर्फ मनोहर पाटील याने पिडीतेस विश्वासात घेऊन मामे तुझ्यावर प्रेम आहे व मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगून शारीरीक संबंध प्रस्थापित केले. परंतू त्यानंतर पिडीतेने संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे विक्की याने पिडीतेस शिवीगाळ करुन तुझ्या आई-वडीलांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. तसेच दि. १२ डिसेंबर रोजी दुपारी पिडीतेला जबरदस्तीने घरी नेत पुन्हा जबरदस्तीने इच्छेविरुध्द शारीरीक संबंध केले. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि निता कायटे ह्या करीत असून संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.