जळगाव (प्रतिनिधी) वर्षभरापासून पत्नी सोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या विकृत पतीविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका परिसरात ३० वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि २७ जानेवारी २०२२ पासून ३५ वर्षीय पती पिडीत पत्नीला वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करण्यास बळजबरी करीत होता. या कृत्याला पिडीतेने विरोध केला असता तिला शिवीगाळ व मारहाण करण्यात येत होती. तसेच मारून टाकण्याची धमकी दिली जात होती. शेवटी त्रास असह्य झाल्यानंतर पिडीत विवाहितेने १ फेब्रुवारी २०२३ रोजी शनिपेठ पोलिसात धाव घेत विकृत पती विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास मपोउपनिरी प्रिया दातीर ह्या करीत आहेत.