TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यात पाच तालुक्यांच्या ठिकाणी होणार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प !

पालकमंत्र्यांचा पाठपुरावा ; जिल्हा नियोजनची प्रशासकीय मान्यता

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोविडच्या प्रतिकारातील सर्वात महत्वाचा घटक असणार्‍या ऑक्सीजनच्या पुरेसा साठा उपलब्ध करण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून पाच तालुक्यांच्या ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे कोविडची पुढील लाट आल्यास याचा प्रतिकार करतांना प्राणवायुची पुरेशी उपलब्धता राहणार आहे. तर नॉन-कोविड प्रकारातील रूग्णांनाही याचा लाभ होणार आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत असली तरी येत्या काही महिन्यांमध्ये कोविडची तिसरी लाट येण्याचा धोका आहे. यामुळे तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने याच्या प्रतिकारासाठी आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. कोविडच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सीजनची गरज मोठ्या प्रमाणात लागली असून भविष्यात याची मागणी अजून वाढण्याची शक्यता आहे.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आधीच जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्लांट उभारण्यात येतील अशी घोषणा केली होती. या अनुषंगाने आता पारोळा कुटीर रूग्णालय, अमळनेर ग्रामीण रूग्णालय, भडगाव ग्रामीण रूग्णालय, धरणगाव ग्रामीण रूग्णालय आणि रावेर ग्रामीण रूग्णालय या पाच ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. हे प्रकल्प प्रत्येकी ३४० एलपीएम क्षमतेचे असून यातील प्रत्येक युनिटला ८० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पाच प्रकल्पांसाठी एकूण चार कोटी रूपयांच्या निधीला मान्यता देण्यात आलेली आहे.

वैद्यकीय उपचारांमध्ये ऑक्सीजन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. सध्या पाचही ग्रामीण रूग्णालयांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू असले तरी भविष्यात कोविड आणि नॉन-कोविड या दोन्ही प्रकारातील रूग्णांच्या ऑक्सीजनची गरज हे प्लांट पूर्ण करणार आहेत. विशेष करून ग्रामीण रूग्णालयात अनेक महिलांना प्रसुतीकाळात ऑक्सीजनची आवश्यकता वाटते. त्यांच्यासाठी भविष्यात पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध राहणार आहे.

याआधी भुसावळचे ट्रॉमा केअर सेंटर, मुक्ताईनगरचे उपजिल्हा रूग्णालय, चोपडा येथील ग्रामीण रूग्णालय, जामनेरचे ग्रामीण रूग्णालय व मोहाडी येथील महिला हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन निर्मिती प्लांटचे काम सुरू झालेले आहे. तर जिल्हा रूग्णालयात देखील ऑक्सीजनची स्वयंपूर्णता झालेली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये ऑक्सीजन निर्मिती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्हा हा ऑक्सीजनच्या दृष्टीने स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून आम्ही यासाठी आधीच प्रयत्न सुरू केले आहेत. आता पाच तालुक्यांमध्ये ऑक्सीजन निर्मिती होणार असल्याने कोविड आणि नॉन-कोविड रूग्णांना याचा लाभ होणार आहे. कोविडच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेचा जिल्हा प्रशासनाने चांगला प्रतिकार केला असून तिसरी लाट आली तरीही प्रशासनला सर्वतोपरी तयारी करून सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
Next Post

जून महिन्याचा विभागीय लोकशाही दिन रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्यांचा वाघ पिंजऱ्यात हे संजय राऊतांनी मान्य केलं’ ; चंद्रकांत पाटलांचा टोला

June 12, 2021

अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

January 20, 2021

भुसावळ दुहेरी हत्याकांड : बारसे, राखुंडेंच्या शरीरातून निघाल्या ९ गोळ्या !

May 31, 2024

जळगाव सेक्स स्कॅन्डल : एक काळाकुट्ट इतिहास !

April 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group