TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांना जन्मदिनाच्या पूर्व सध्येला उर्दू साहित्यिकांकडून आदरांजली !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 11, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नही खेल है दाग यारो से कह दो, के आती है उर्दू जुबा आते आते. मी अलिफ (अ) लिहून उर्दूची सुरुवात केली आहे. त्यानुसार उर्दू बोलो, उर्दु लिखो, उर्दू पढो समजो ज्याप्रमाणे पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांनी प्रत्येक भाषेला महत्त्व दिले. त्यांच्या त्या कृतार्थ जळगाव जिल्हा मनियार बिरादरीने त्यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त जो उर्दू साहित्यिकांचा मेळावा आयोजित केला आहे. त्या मेळाव्याचे मी उद्घाटन करीत आहे, अशा शब्दांत महापौर जयश्री महाजन यांनी आपल्या भावना व्यक्त करून उर्दू मेळाव्याचे उद्घाटन केले.

यावेळी व्यासपीठावर मुंबई उर्दू कारवाचे अध्यक्ष फरीद अहमद, एटीएमचे अध्यक्ष एजाज मलिक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. रफिक आजी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे टेक्नॉलॉजी हेड ऑफ द डिपार्टमेंट प्रोफेसर डॉ. गयास उस्मानी, पिंच बॉटलचे मॅनेजिंग डायरेक्टर जफर शेख, श्रेष्ठ कादंबरीकार व कवी जोहर उस्मानी तथा जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख उपस्थित होते. सर्वप्रथम पवित्र कुराण पठण मौलाना मुष्टाक पटेल यांनी केले तर नात मजर मुस्तफाबाद यांनी सादर केले तर उर्दू तराना ए के के गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनीनी सादर करून सर्वाना मंत्र मुग्ध केले.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी सादर करताना प्रथमताच जिल्ह्यातील सर्व उर्दु साहित्यिकांना एका छताखाली बोलून त्यांचा सन्मान करण्याचा प्रयोग करीत असून यशस्वी झाल्यास तो जळगाव पॅटर्न म्हणून प्रसिद्धीला येईल व त्यामुळे उर्दू लेखाकार शायर (कवी) अफ़सनानिगार (लघु लेखक व कादंबरीकार) व सहाफी (पत्रकार) यांचे महत्व समाजाला समजेल म्हणून पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष फरीद अहमद यांनी महाराष्ट्रमध्ये प्रथमताच अशा स्वरूपाचा कार्यक्रम होत आहे आणि हे कांताई सभागृह या गोष्टीची ऐतिहासिक नोंद ठेवील की तो कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी झाला. जे कार्य आम्ही मुंबईपासून करू शकत नाही ते जळगावात मनियार बिरादरीच्या माध्यमाने साकारण्यात आल्याचा मला अभिमान आहे. महापौर यांना त्यांनी उर्दू घर साठी जागेची मागणी केली.

यांचे झाले मनोगत

डॉ. गयास उस्मानी यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. परंतु एकाच छताखाली शायर कवी अफसाना निगार लघु लेखक व कादंबरीकार सहाफी पत्रकार एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित राहून आपला सत्कार स्वीकारला हा एक ऐतिहासिक क्षण मी विसरू शकत नाही. राष्ट्रवादीचे तथा एटीएमचे अध्यक्ष एजाज मलिक यांनी आपल्या मनोगतात उर्दू भाषा तिचे महत्त्व व त्यासाठी त्यांची संस्था करीत असलेल्या कार्याचा आढावा सादर केला

यांनी सादर केल्या आपल्या कविता

अक्रम कुरेशी
अपना लोहा हर जगह मानव रही है बेटिया
और तिरंगा चांद पर लहरा रही है बेटिया
हर मुहिम मे मुल्क की ये बराबर शरीक
कोख मे ही मारी जा रही है बेटिया

अंजर मुस्तफाआबादी
क्यू मीटाते हो नाम उर्दू का
जग मे कुछ तो मिठास रहने दो

२७२ साहित्यिकांचा गुणगौरव

जिल्ह्यातील एकूण ३१२ उर्दू साहित्यकार यांना व्हाट्सअपद्वारे आमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी २७२ साहित्यिक उपस्थित राहून आपला सत्कार स्वीकारला. उपस्थितांमध्ये पुरुषांचा सहित महिलांचा सुद्धा सहभाग होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बहारदार अशा कविता सादर करून सूत्रसंचालन करणारे साबीर मुस्तफा आबादि तसेच यशस्वीतेसाठी कासिम उमर, मुजाहिद खान, मोहसीन शेख, अल्ताफ शेख, रऊफ टेलर, इमरान खान, तय्यब शेख, जाहिद शेख, वनिता विश्व महिला मंडळ व भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनने परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे आभार बिरादरीचे सचिव अब्दुल अजीज शेख यांनी मानले तर पाहुण्यांचे स्वागत सय्यद चाँद, हकीम चौधरी, असलम शेख, तय्यब शेख, लतीफ शेख, फारुक शेख आदींनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा क्रिडा संकुलातील जलतरण तलावाचे मिलींद दिक्षीत यांच्या हस्ते उद्घाटन !

April 22, 2022

बीएचआर घोटाळा : साक्षीदारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर ; फरारी झंवरची खटल्यावर बारीक नजर !

May 30, 2021

मी पळालो नाही, मला पळवलं गेलं ; यामध्ये कोणाकोणाचा हात, सगळं सांगणार : ड्रग माफिया ललित पाटीलचा खळबळजनक गौप्यस्फोट !

October 18, 2023

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ३५ कोरोनाबाधित, ६५ झाले बरे !

June 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group