TheClearNews.Com
Monday, May 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मनसुख हिरेन हत्येच्या कटात परमबीर सिंहच मास्टरमाईंड’ ; अनिल देशमुखांचा जबाबाने खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 3, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अँटिलियासमोर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी तसेच १०० कोटी वसूली प्रकरणी अनेक नवीन खुलासे होताना दिसत आहे. अँटिलियासमोर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी परमबीर सिंह हेच मास्टरमाईंड असल्याचं कळलं होतं, असा जबाब माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीसमोर दिला आहे. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात देशमुखांच्या या जबाबाची नोंद करण्यात आली आहे.

अँटिलियासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आपल्याला माहिती देताना परमबीर सिंह दिशाभूल करत होते. कारण या प्रकरणात त्यांचे सहकारी सचिन वाझे यांचं नाव समोर आलं होतं आणि सिंह हेच त्याचे मास्टरमाईंड आहेत, असं आपल्याला कळलं होतं. म्हणून त्यांना आयुक्तपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आणि नैतिकता म्हणून आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असं अनिल देशमुख यांनी सांगितल्याचं ईडीनं आरोपपत्रात नमूद केलं आहे.

READ ALSO

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

परमबीर सिंह यांना १७ मार्च २०२१ रोजी आयुक्तपदावरून हटवल्यानंतर त्यांनी २० मार्च २०२१ रोजी माझ्यावर खोटे आरोप केले. अँटिलिया घोटाळा आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांच्यासह त्यांचे जवळचे मित्र सचिन वाझे आणि अन्य चार जणांची नावं समोर आल्यानं सिंह यांना आयुक्तपदावरून हटवण्यात आलं होतं. सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी मनसुख हिरेन यांनी स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या काठ्या लावल्याचा आरोप होता, या प्रकरणी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली होती. ५ मार्च २०२१ रोजी विधानसभा सुरू असताना सिंह यांना विधानसभेत ब्रीफिंगसाठी बोलावलं होतं, तेव्हा मी गृहमंत्री होतो आणि सिंह यांना बोलावलं तेव्हा मी, अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, लिमये आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होतो. त्या ब्रीफिंग दरम्यान अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हत्येच्या संदर्भात सिंह देत असलेली ब्रीफिंग दिशाभूल करणारी होती, असं देशमुखांनी ईडीच्या जबाबात म्हटलं आहे.

यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला. काही दिवसांनी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ब्रीफिंग होत असताना मी, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि गृह विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होतो. त्या ब्रीफिंग दरम्यान हे देखील समोर आलं की, सिंह त्यांच्या उत्तरानं आमची दिशाभूल करत आहेत आणि सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं देशमुखांनी ईडीच्या जबाबात म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

May 10, 2026
गुन्हे

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

May 10, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
गुन्हे

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026
गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

May 8, 2026
Next Post

अवैध दारूच्या अड्ड्यावर धाड टाकत १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त ; भुसावळ पथकाची धडाकेबाज कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कनाशी येथील बालकाचा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू !

November 28, 2024

जळगावात धाडसी घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज लंपास !

January 4, 2023

मुलगी पाहण्यासाठी जाण्यापूर्वीच तरुणाला नांदेड फाट्याजवळ लुटले !

December 17, 2024

लाडली येथील लाडकेश्वर मंदिरात महादेवाचे पालकमंत्र्यांनी घेतले दर्शन !

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group