जळगाव प्रतिनिधी – शहरातील पर्यावरणप्रेमी डॉ. नितीन महाजन, उद्योजक सुबोध कुमार चौधरी (संचालक – सुबोनियो केमिकल्स लिमिटेड), तसेच उद्योजक अश्विन राणे यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून एक भव्य वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत शहरापासून जवळ असलेल्या मोहाडी टेकडीवर तब्बल ५००० वृक्षांचे रोपण आणि २ लाख देशी वृक्षांच्या बिया टाकण्याचे काम करण्यात येणार असून हा कार्यक्रम २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे या जाणिवेतून “वृक्षसंपदेचा ध्यास” घेत मराठी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
या अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमाला शहरातील सर्व वृक्षप्रेमींनी, निसर्गप्रेमींनी, सामाजिक संस्थांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा.
आपला नम्र
ॲड जमील देशपांडे
अध्यक्ष मराठी प्रतिष्ठान, जळगांव