मुंबई (वृत्तसंस्था) भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. यासंबंधीची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले होते.
यातच मिळालेल्या माहितीनुसार, सेंट जॉर्ज सरकारी रुग्णालयात फडणवीसांवर प्लाझ्मा थेरपी उपचार करण्यात आले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली होती की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी औषधोपचार घेतो आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले होते.