TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

vijay waghmare by vijay waghmare
July 13, 2026
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील नांदूरखेडा शिवारात कपाशीच्या शेतात आढळलेल्या ३० वर्षीय मजुराच्या हत्येचा उलगडा रावेर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत केला आहे. मयताच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधांच्या वादातून दोन जणांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून. पुढील तपास सुरू आहे. एका आरोपीला मध्य प्रदेशातील सागर येथून तर दुसऱ्या आरोपीला रावेर स्टेशन परिसरातून पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख कुरबान शेख शब्बीर (वय ३०) हा ९ जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह ११ जुलै रोजी सकाळी नांदूरखेडा शिवारातील कपाशीच्या शेतात आढळून आला. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित गणेश संजय घोरपडे याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. एप्रिल २०२६ मध्ये ऐनपूर येथे दोघांना रंगेहात पकडण्यात आले होते.

READ ALSO

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

त्यावेळी झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून गणेश घोरपडे याने मयताला, “आमच्या संबंधांमध्ये हस्तक्षेप केलास तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे तपासात उघड झाले. ९ जुलैच्या रात्री गणेश घोरपडे आणि मेघराज वसंत सांगळे यांनी शेख कुरबान याला दारू पाजून मोटारसायकलवरून नांदूरखेडा शिवारात नेले. तेथे हाताने गळा आवळून त्याची हत्या केली.

त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कपाशीच्या शेतात टाकून दोघेही पसार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मयताचा भाऊ शेख सलमान शेख शब्बीर (रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात मेघराज वसंत सांगळे याला अटक करण्यात आली असून मुख्य संशयित गणेश संजय घोरपडे याला मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील सागवानी (तहसील जयशिनगर) येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस उपनिरीक्षक तुषार सुधाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास मार्गदर्शनाखाली तपास पथकाने वेगवान आणि तांत्रिक तपास करून खुनाचे गूढ उकलले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Police have arrested two accused in connection with a murder case in the Nandurkheda area.raver

Related Posts

गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
Next Post

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोनिया सक्रिय नाहीत, यूपीएचं नेतृत्व आता शरद पवारांनी करावं : संजय राऊत

March 20, 2021

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप पहिला सामना!

November 2, 2020

‘आंदोलनजीवीं’नी शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम केलं : पंतप्रधान मोदी

February 10, 2021

Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल महिन्याचा पहिला दिवस !

February 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group