धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील हनुमान नगर येथील शौचालयांची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्याची कोरोना परिस्थिती पाहता नगर प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेसाठी कंबर कसली असली तरी शहरातील स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
येणारा पावसाळा लक्षात घेता व शौचालयांची दुरवस्था पाहता लवकरात लवकर नगरपरिषदेने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन शौचालयांची सांडपाण्याची व्यवस्था सुव्यवस्थित करावी. असे येथील स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. येथे होत असलेल्या अस्वच्छतेमुळे डासांचा फैलाव, मलेरिया, डेंग्यूची साथ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
हनुमान नगर येथील शौचालयांमध्ये महिला व पुरुष दोघांचे शौचालय असून येथील ठिकाणाची पाईप लाईन फुटलेल्या असल्याकारणाने बाहेर गटारी द्वरे नागरिकांच्या घरासमोर पाणी वाहत असून त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी व घाण साचलेली आहे. त्यामुळे परिसरातील स्थानिक रहिवासी त्रस्त असून नगर प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
ढाब्यावरील अवजड वाहन गेल्याने त्या ठिकाणी जास्त प्रमाणात ते पाणी बाहेर आलेले दिसून येत आहे लवकरच दुरुस्त करण्याची वर कोठारी निघालेले आहे. शहरात शौचालय नवीन बांधकाम करणे सुरू असून ते लवकरात लवकर धरणगावकरांच्या सेवेत येतील, असे आश्वासन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी दिले.
शौचालयाच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना येथून वापरणे व राहणे नकोसे झाले असून नगरपालिकेने त्वरित लक्ष द्यावे, असे स्थानिक रहिवासी गौरव सिंग चव्हाण यांनी सांगितले.
















