धरणगाव (प्रतिनिधी) येथील तालुक्यातील असलेले जुन्या पंचायत समितीत शासकीय विश्रामगृह असून या ठिकाणी गेल्या चार ते पाच महिन्यापासून बंद अवस्थेत दिसून येत आहे. याठिकाणी वीज वितरण कंपनीचे ४२ हजार रुपये थकीत असून वीज वितरण कंपनीने मीटर काढून नेले असून ते आज बंद अवस्थेत दिसून येत आहे.
येथील कोणीही येऊन शासकीय विश्रामगृहात ओल्या पार्ट्या चालत असतात. त्याअनुषंगाने जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत ते सध्या बंद अवस्थेत दिसून येते आहे. येथे लायसन्स कॅम्प दरमहा दोन वेळेस होत असून तो देखील वीज कनेक्शन नसल्याने एरंडोल या ठिकाणी होत आहे. नागरिकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. येथील रेस्ट हाऊसचे वीज कनेक्शन कापले असून धरणगाव तालुक्यात फार मोठी शोकांतिका व्यक्त करण्यात येत आहे.
वीज कनेक्शन भरण्यास पुरेसा निधी नाही
धरणगाव विश्राम गृह बंद अवस्थेत असून त्यात वीज कनेक्शन भरण्यास पुरेसा निधी नसुन व त्या ठिकाणी ओल्या पार्ट्या करताना नागरिक आढळून आलेले असून व विश्राम गृहाला आतून मोठ्या प्रमाणावर खर्च लागणार असल्याचे जळगाव प्रभारी उपअभियंता नंदू पवार यांनी सांगितले.