धरणगाव (प्रतिनिधी) प्रतापराव गुलाबराव पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी जळगाव जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांनी केली आहे.
जळगाव जिल्हा विधानपरिषद चंदुभाई पटेल यांच्या कार्यकाळ संपवण्यात येत असून या रिक्त होणाऱ्या जागेवर जिल्हा परिषद सदस्य तथा जळगाव जिल्हाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप गुलाबराव पाटील यांना विधानपरिषद उमेदवारी दयावी अशी मागणी जळगाव जिल्हाचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांनी केले आहे. प्रताप गुलाबराव पाटील हे पाळधी गटातून निवडून आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये युवा सेना यांच्या माध्यमातून यांनी जळगाव जिल्हा पिंजून काढला असून त्यांनी फार मोठा युवासेनेच्या तयार केला आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात कुठे लग्न असेल श्रद्धांजली असेल या कार्यक्रमांमध्ये ते नेहमी अग्रेसर असतात पाळधी हायवेवर अपघात होत असतात अशावेळी ते आपल्या सहकाऱ्यांना घेऊन जिथे मदत लागत असेल तात्काळ अंबूलस पाठवून मागचा पुढचा विचार न करता सरळ दवाखान्यात भरती करतात आणि त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी संपर्क साधला. जिल्ह्यामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून फार मोठी फळी त्यांनी तयार केली असून भविष्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद असतील जि प निवडणुका असं निवडणुका यासाठी फार मोठा त्याचा पक्षाला फायदा होणार आहे.
महाविकास आघाडीतर्फे जिल्ह्यावर यामध्ये जास्तीत जास्त जागा नगरपरिषद जिल्हा परिषद निवडून आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागावे जेणेकरून जास्त जास्त जागा निवडून आल्या तर आपल्याला विधानपरिषदेवर महाविकास आघाडीतर्फे आपला उमेदवार निवडून देणे सोपे होईल. जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडी कॉंग्रेस पक्ष राष्ट्रवादी शिवसेना व मित्रपरिवार हेसुद्धा प्रताप गुलाबराव पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील अशी अपेक्षा आहे. या संदर्भात जळगाव जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ,जिल्हा प्रमुख विष्णू भाऊ भंगाळे, तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी स्वरूपात प्रताप गुलाबराव पाटील जि प सदस्य यांना उमेदवारी देण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांनी केली आहे.