TheClearNews.Com
Friday, November 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली कार्यक्रमस्थळाची पाहणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 25, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जळगाव येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम मंगळवार, 27 जून 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य समारंभ पोलीस कवायत मैदान, जळगाव येथे होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्पयात आली असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज या ठिकाणाची पाहणी केली.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण योगेश पाटील, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, प्रांताधिकारी महेश सुधाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

READ ALSO

महावितरणच्या जळगाव परिमंडलात संविधान दिन साजरा

‍महावितरणच्या अभय योजनेची जळगावात रॅलीद्वारे जनजागृती

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी मुख्य स्टेज, सभा मंडप, लोकप्रतिनिधींची व मान्यवर बैठक व्यवस्था त्याचबरोबर लाभार्थ्यांची येण्या-जाण्याचे मार्ग, बैठक व्यवस्था, जिल्ह्यातील सरपंचांची बैठक व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, रोजगार मेळावा, कृषि प्रदर्शन, आरोग्य शि‍बिर जागा, पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आदींची पाहणी करुन प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी श्री. मित्तल व पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांचेकडून जाणून घेतली.

यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जळगावचा जिल्हास्तरीय कार्यक्रम हा आतापर्यंतच्या कार्यक्रमांपेक्षा सरस होईल याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने नियोजन केलेले आहे. कार्यक्रमाच्या दिवशी लाभार्थी कार्यक्रमस्थळी येतांना त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. विशेषत: वयोवृध्द लाभार्थी, दिव्यांग लाभार्थी, लहान बालके, शालेय विद्यार्थी यांची विशेष काळजी घेण्याच्या सुचना त्यांनी दिल्यात. वाहनतळ ते कार्यक्रमस्थळावरील मार्गावर वाहतुकीचे नियोजन व्यवस्थीत करण्याबाबतही त्यांनी सुचित केले.

35 हजार लाभार्थ्यांच्या उपस्थितीचे नियोजन !
जळगाव जिल्ह्यात शासन आपल्या दारी अभियान राबविण्यास 15 एप्रिल, 2023 पासून सुरुवात करण्यात आली असून शासनाच्या विविध विभागामार्फत जिल्ह्यातील 2 लाख 53 हजार 124 लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले आहे. त्यापैकी 35 हजार लाभार्थी कार्यक्रमास उपस्थित राहतील याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.

250 बस, 1 हजार चारचाकी तर 2100 दुचाकी वाहने पार्कीगची व्यवस्था !
या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांना कार्यक्रमास उपस्थित राहता यावे याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे गाव व तालुका पातळीवरुन वाहतुक व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळ व खाजगी 250 बसेस उपलब्ध करुन दिल्या आहे. तसेच 1 हजार चारचाकी तर 2100 पेक्षा अधिक दुचाकी वाहने जळगाव शहरात येतील असे गृहित धरुन एकलव्य क्रीडा संकुल, जी. एस. मैदान, नेरी नाका ट्रॅव्हल्स पॉईन्ट, सागर पार्क, खानदेश सेट्रल मॉल याठिकाणी वाहने पार्किगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर एसटी वर्कशॉप, ब्रुक बॅण्ड कॉलनी, रिंगरोड याठिकाणी राखीव पार्किंगसाठी ठेवण्यात आली आहे.

कार्यक्रमस्थळी आरोग्य शिबिराचे आयोजन !
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्यास्थळी जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 27 जून रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत रोगनिदान व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मुख्यत्वे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह या रुग्णांची तपासणी ककरण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास पुढील उपचार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या शिबिरात रुग्णांच्या आवश्यक त्या सर्व रक्त तपासणी चाचण्या मोफत करण्यात येणार आहे. शिवाय इतर आजार जसे सिकलसेल/थॅलेसेमिया/मधुमेह/उच्च रक्तदाब/कॅन्सर/मानसिक आजार यांची तज्ञ डॉक्टर कडून तपासणी, समुपदेशन व उपचार करण्यात येणार आहे.

या शिबिरात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभर्थ्यांना गोल्डन कार्ड व आयुष्मान भारत हेल्थ कार्ड योजनेसंदर्भातील लाभार्थी यांना माहिती व कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थी यांनी आधार कार्डसोबत नोंदविलेला मोबाईल क्रमांक व आधार कार्ड तसेच रेशन कार्ड सोबत आणावे. याठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले असल्याने ज्या रक्तदात्यांना स्वयस्फुर्तीने रक्तदान करावयाचे आहे त्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमस्थळी शासनाच्या विविध विभागांच्या 25 स्टॉलची उभारणी !
शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जिल्हा पोलिस कवायत मैदान येथे मंगळवार 27 जून, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता शासनाच्या विविध विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल लावण्यात येणार आहे. याठिकाणी नागरीक व लाभार्थी यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

याठिकाणी कृषी विभाग, जळगाव शहर महानगरपालिका, आदिवासी विकास विकास, भूमि अभिलेख, क्रीडा विभाग, जिल्हा परिषद, आधार केंद्र, लीड बैंक, जिल्हा उद्योग केंद्र, वन विभाग, पशु संवर्धन विभाग, समाज कल्याण, नगर विकास, मत्स्य विकास, महसूल, जिल्हा महिला व बाल विकास, शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, हिरकणी कक्ष, आरोग्य तपासणी कक्ष व मा. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष याप्रमाणे विविध विभागांचे 25 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी येणाऱ्या नागरीकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

रोजगार मेळाव्यासाठी विविध कंपन्यांनी कळविली 2241 रिक्तपदांची माहिती !
शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 27 जून, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता नुतन मराठा महाविद्यालय येथे ऑफलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारण १० वी १२ वी सर्व पदवीधारक/आयटीआय सर्व ट्रेड/डिप्लोमा सर्व ट्रेड/बीई मेकॅनिकल/बीसीए/एमबीए/बीई/डी. फॉर्म/बी.फॉर्म/सर्व डिग्रीधारक उमेदवारांसाठी विविध खाजगी आस्थापनांनी २२४१ रिक्त पदे भरण्याचे कळविले आहे.
या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या ईच्छुक उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अॅप्लाय करावा. तसेच उमेदवारांनी नावनोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्यात मुलाखतीसाठी हजर रहावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात संविधान दिन साजरा

November 26, 2026
जळगाव

‍महावितरणच्या अभय योजनेची जळगावात रॅलीद्वारे जनजागृती

November 26, 2026
जळगाव

जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन

November 26, 2026
गुन्हे

बारडोली येथे पाच जणांना कालव्यात फेकल्याच्या घटनेचे मेहुणबाऱ्यापर्यंत धागेदोरे

November 26, 2026
गुन्हे

रेल्वे स्टेशनवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला घरफोडीचा आरोपी जेरबंद; दोन दिवसांत गुन्ह्याची उकल !

November 26, 2026
जळगाव

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद

November 25, 2026
Next Post

जळगाव एमआयडीसी पोलिसांकडून ५५ गुरांची सुटका ; आठ जणांविरुद्ध गुन्हा, कत्तलखान्यावरही कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोकण-मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस ; जळगावसह १७ जिल्ह्यांना अलर्ट !

December 1, 2021

चाळीसगाव हादरलं : दुसरीही मुलगी झाल्यानं केला पत्नीचा खून ; नंतर पतीनंही केलं भयंकर कृत्य !

November 30, 2022

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 12 एप्रिल 2024 !

April 12, 2024

जळगाव : तरूणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या एकाला अटक; एमआयडीसीत गुन्हा दाखल !

August 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group