TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कैद्यांना सूट देणं भोवले ! चार पोलीस कर्मचारी निलंबित, जळगाव SP यांची कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
May 11, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी निलंबित केले आहे. एकाचवेळी चार कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पंडीतराव ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल पारस नरेंद्र बाविस्कर, पोलीस कॉन्स्टेबल किरण अशोक कोळी, पोलीस कॉन्स्टेबल राजेश पुरुषोत्तम कोळी, अशी निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

खुनाच्या गुन्ह्यातील दशरथ बुधा महाजन रा.एरंडोल, सतीश मिलिंद गायकवाड रा. आंबेडकर नगर, जळगाव यांच्यासह पाच कैदी जिल्हा रुग्णालयातील कैदी वार्डात दाखल झाले होते. रविवारी रात्री यापैकी दशरथ महाजन व सतीश गायकवाड दोन कैद्यांमध्ये वाद होवून हाणामारी झाली. भांडण करणाऱ्यांना शांत करण्यासाठी कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल राजेश कोळी हे चावीने दरवाजा उघडून आत गेले. त्यावेळी आरोपी सतिष गायकवाड याने पोलिस कर्मचारी राजेश कोळी यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. ‘तु आमच्या वादात पडू नको नाहीतर चाकूने तुझा मर्डर करुन टाकेन’, अशी धमकी सतीष गायकवाड याने पोलिस कर्मचारी कोळी यांना दिली होती. तसेच कर्मचाऱ्याला लोटून दिले होते. याप्रकरणाने जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. भितीने रुग्ण तसेच कर्मचारी जीव वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळत सुटले होते. घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी अखेर फौजफाटा बोलवावा लागला होता.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

या घटनेची पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी गांभिर्याने दखल घेतली तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस कर्मचारी सतीश कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मंगळवारी जिल्हापेठ पोलिसात कैदी सतिष मिलींद गायकवाड व त्याचे इतर मित्र आणी नातेवाईक अशांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यांनी कैद्यांना मोबाईल वापरासह इतर मुभा दिल्याने तसेच कर्तव्यात कसूर केल्याचे समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी जिल्हा रुग्णालयात घटनेच्या दिवशी कर्तव्य बजावणारे चार पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच याप्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना नियुक्त करण्यात आले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

धरणगाव जागृत जनमंचची पालिकेच्या प्रभाग रचनेवर जोरदार हरकत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

योगेश पाटील राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित !

December 10, 2022

भारतमातेच्या रक्षणासाठी वक्फ कायद्याचे दहन अत्यावश्यक : प्रशांत जुवेकर !

May 2, 2023

महानगरपालिकेच्या बसडेपो बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले भूमिपूजन !

October 14, 2024

धक्कादायक ! घरात घुसून भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सामुहिक बलात्कार

August 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group