- जळगाव (प्रतिनिधी) सुबोनियो केमिकल्स लिमिटेड -मराठी प्रतिष्ठान व जळगाव महानगर पालिका यांच्या संयुक्त सहकार्याने मेहरुन तलाव किनाऱ्यावर सत्तर फूट उंच असे ऐतिहासिक सुबोनियो पक्षी घराची उभारणी करण्यात आली आहे. अतिशय आकर्षक व रंगीबेरंगी पक्षी घराच्या भिंतीवर विविध प्रकारचे अतिशय सुंदर पक्षीचित्र रेखाटन बेंडाळे कॉलेजच्या प्रा.सविता नंदनवार ह्या करीत आहेत.
प्रा.सविता नंदनवार यांचे कलेचे शिक्षण पुणे येथील अभिनव कला महाविद्यालयात व सर.जे.जे. स्कुल ऑफ आर्ट, मुंबई येथे झाले आहे. प्रा.सविता नंदनवार यांनी खिरोदा, ता.यावल जिल्हा जळगाव येथील ललित कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. कलाक्षेत्रासह साहित्य क्षेत्रात सुद्धा त्यांचे कार्य आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात त्या कार्यरत आहेत.
एम ए एम फील पीएचडी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले असून त्या मराठी प्रतिष्ठान च्या विश्वस्त आहेत. सुबोनिया पक्षी घर या ऐतिहासिक वास्तूवर चित्र रेखाटन करतांना खूप आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया प्रा.सविता नंदनवार यांनी दिली.
दरम्यान सुबोनियो केमिकल्स चे संचालक सुबोध चौधरी, सुनील चौधरी, सुयोग चौधरी, सुमोल चौधरी यांच्या विशेष सहकार्याने सुबोनियो पक्षी घराची वास्तू उभारता आली आहे. जळगाव येथील सुबोनियो परिवार सामाजिक कामात अग्रेसर आहेत. पक्षी चित्र रेखाटन करणाऱ्या प्रा.सविता नंदनवार यांचे मराठी प्रतिष्ठानच्या संध्या विजय वाणी, अनुराधा सतीश रावेरकर, निलोफर जमील देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे.