TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गत वर्षाच्या तुलनेत तीनपट ३६.६ कोटींचा नफा ; जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.चे तिमाही आर्थिक निकाल जाहीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 10, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतातील सर्वात मोठी ठिबक, सूक्ष्म सिंचन आणि केळी, डाळिंब टिश्युकल्चर रोपे निर्मितीत अग्रेसर जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आज पहिल्या तिमाहीचे एकल तसेच एकत्रित निकाल जाहीर केले. ८ ऑगस्ट रोजी जळगाव येथे झालेल्या कंपनी संचालक मंडळाच्या सभेत कंपनीने गत वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात तीनपटीहून अधिक म्हणजेच ३६.६ कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. सध्या कंपनीच्या हातात एकूण १९२९ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. त्यात अन्न प्रक्रिया विभागाकडे १००१.३ कोटी रुपयांच्या, हायटेक अॅग्री इनपुटसकडे ४०४.१ कोटी तर प्लास्टिक विभागाकडे ५२३.६ कोटी रुपयांच्या भरभक्कम ऑर्डर्स असल्याचे जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले.

कंपनीच्या तिमाहिच्या एकत्रीत महसुलाचा विचार केला असता गत आर्थिक वर्षात १४१६.२ कोटी रुपये होता तो या आर्थिक वर्षात २०.१ टक्क्यांनी वाढून १७०१.० कोटी रुपये झालेला आहे. व्याज, कर, घसारा आणि कर्जापूर्वीची रक्कम गत आर्थिक वर्षात १८०.४ कोटी रुपये तर या वर्षी ती २५.९ टक्क्यांनी वाढून २२७.१ कोटी रुपये इतकी झाली. एकत्रित कर पश्चात नफ्याचा विचार करता गत आर्थिक वर्षात तो ११.८ कोटी रुपये होता तो ह्या वर्षी तिप्पट झाला आहे म्हणजेच ३६.६ कोटी रुपये इतका झालेला आहे.

READ ALSO

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

कंपनीचा गत आर्थिक वर्षातील एकल महसुल हा ८६१.७ तर ह्या वर्षी ३२.९ टक्क्यांनी वाढून ११४६ कोटी रुपये झाला. व्याज, कर, घसारा आणि कर्जापूर्वीची रक्कम गत आर्थिक वर्षात १०९.७ कोटी तर या वर्षी ती ४३.४ टक्क्यांनी वाढून १५७.३ कोटी रुपये इतकी झाली. कंपनीच्या एकल कर पश्चात नफ्याचा विचार करता गत आर्थिक वर्षात तोटा ५.५ कोटी रुपये होता तो ह्या वर्षी ५.८ पटीने वाढून २६.२ कोटी रुपये इतका झालेला आहे.

“३० जून २०२३ ला संपणाऱ्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. या काळात कंपनीच्या एमआयएस, पाईप्स आणि टिश्यू कल्चर विभागातील उत्पादनांना चांगल्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. सकारात्मक धोरणांमुळे कंपनीने वरील विभागात चांगला मार्केट शेअर मिळवला आहे. प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या किंमतीत थोडी घट आणि खेळत्या भांडवलाचे उत्तम व्यवस्थापन यामुळे एकत्रीत संपूर्ण उत्पन्नात २० टक्के आणि तिमाहीतील वाढ कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात २६ टक्के करता आली. कंपनी संपूर्ण कर्ज कमी करणे, खेळत्या भांडवलाच्या चक्रात सुधारणा करणे आणि वाढीसह मार्जिनमध्ये पण सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहे. उत्पादनांत नाविन्य, शेतकऱ्यांसाठी शाश्वत पर्यावरणाचे उपाय आणि वितरकांच्या जाळ्याचा विस्तार भारतात करणे यावर कंपनीचे व्यवस्थापन लक्ष केंद्रित करीत आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात आम्ही सकारात्मक वाटचाल दुसऱ्या तिमाहीत करत राहू अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी दिली. ”

आर्थिक वर्ष २०२३-२४ पहिल्या तिमाहीच्या एकल आर्थिक निकालाची ठळक वैशिष्ट्ये !

कंपनीला प्लास्टिक विभागामध्ये किरकोळ बाजारातील चांगल्या ऑर्डर्स खास करून महाराष्ट्र, पश्चिम आणि दक्षिण भारतातील ऑर्डर्स जल जीवन मिशन (जेजेएम) उपक्रमाच्या अंमलबजावणीमुळे संपूर्ण उत्पन्नात ३३ टक्के वाढ साध्य करता आली आहे.

निर्यात आणि प्रकल्प व्यवसायातील अपेक्षित घट यामुळे हायटेक कृषी विभागातील उत्पन्न जवळजवळ मागील तुलनेत सपाट म्हणजे तसेच सारखे राहिले. परंतु किरकोळ एमआयएस (२० टक्के) आणि टिश्यू कल्चर (४४ टक्के) या व्यवसाय विभागात खूप चांगली वाढ कंपनीने नोंदवली आहे कारण कंपनीने या व्यवसायांमध्ये उत्तम लक्ष केंद्रित केले आहे.

प्लास्टिक विभागाची कामगिरी उत्तम असून त्यामध्ये १०३ टक्के वाढ साध्य केली. जल जीवन मिशन (जेजेएम) आणि पीव्हीसी पाईप्सला असलेल्या महाराष्ट्र व पश्चिम भारतातील राज्यांमध्ये असलेल्या चांगल्या मागण्यांमुळे या विभागात उत्तम ऑर्डर्समुळे ही वाढ करता आली.

आर्थिक वर्ष २०२३-२४च्या पहिल्या तिमाहीच्या एकत्रित आर्थिक निकालाची वैशिष्ट्ये !

भारतातील पाईप आणि एमआयएस विभागातील चांगल्या ऑर्डर्समुळे संपूर्ण एकत्रित उत्पन्नात वाढ झाली आहे. प्लास्टिक विभागाच्या उत्तम कामगिरीमुळे जेआयएसएलला चांगला मार्जिन कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात साध्य करता आला.

हायटेक विभागात किरकोळ एमआयएस (२०टक्के वाढ) आणि टिश्यूकल्चर (४४ टक्के वाढ) झाली पण प्रकल्प आणि निर्यात व्यवसायांमध्ये मात्र अपेक्षित घट झाली. त्यामुळे हायटेक विभागाच्या संपूर्ण उत्पन्नात ३ टक्क्यांनी घट झाली.

जल जीवन मिशनला चांगला पुरवठा केल्यामुळे आणि पीव्हीसी व पीई पाईपमधील महाराष्ट्रातून असलेल्या चांगल्या ऑर्डर्समुळे ७.९ टक्के वाढ प्लास्टिक व्यवसायात नोंदवता आली.

भारतातील भाज्या निर्जलीकरण व्यवसायाने ९.८ टक्क्यांची आणि विदेशातील कृषी विभागात झालेल्या ७.६ टक्के वाढ साध्य केली. अंतिम गतवर्षी फळ प्रक्रिया विभागाने मात्र वजा वाढ एकत्रित निकालात नोंदवली. याचे कारण म्हणजे कच्च्या मालाची अनुपलब्धता असल्याने पक्का माल शिल्लक राहीला नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
क्रीडा

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

June 21, 2025
क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
जळगाव

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम

June 21, 2025
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

June 21, 2025
गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
Next Post

पती-पत्नी घराबाहेर, कुलूप तोडून चोरट्यांनी लांबविला लाखोंचा ऐवज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लाचेची मागणी : रावेरचा वन परिक्षेत्रीय अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक !

January 18, 2022

पॉलिशच्या बहाण्याने लांबविले सव्वा लाखाचे दागिने ; जळगाव पोलिसात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा !

July 6, 2023

होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या !

September 16, 2020

राष्ट्रवादी आदिवासी सेलतर्फे मणिपूर येथील घटनेचा निषेध !

July 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group