TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘एक गाव एक गणपती’तून गावातील एकोप्याला चालना : ना. गुलाबराव पाटील

देऊळवाडे येथील विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन ; उर्वरित कामे लवकरच मार्गी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना अतिशय उत्तम असून देऊळवाडेकरांनी याच्या माध्यमातून एकजुटीचे दर्शन घडविले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून गावातील एकोप्याला चालना मिळत असल्याने इतर गावांनी देखील याचा आदर्श घ्यावा असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील देऊळवाडे येथील गणरायाची आरती केल्यानंतर बोलत होते.

दरम्यान, पालकमंत्र्यांच्याच हस्ते गावातील विविध विकासकामांचे भूमिपुजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना देऊळवाडेत आधीच विकासकामे सुरू असून लवकरच उर्वरित कामांना गती देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. याबाबत वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील देऊळवाडे येथील ग्रामस्थांनी ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेच्या अंतर्गत गावामध्ये एकाच गणरायाची स्थापना केली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या मंडळाला भेट देऊन गणरायाची आरती केली. याप्रसंगी प्रारंभी ग्रामस्थांच्यावतीने पालकमंत्र्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. आरती झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण व भूमिपुजन करण्यात आले.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी देऊळवाडे गावात विविध कामांना गती मिळाली आहे. यात शाळा खोलीचे बांधकाम- ८ लक्ष रूपये; शाळेला संरक्षक भिंत- ७ लक्ष रूपये; चावडी चौकात पेव्हर ब्लॉक बसविणे-३ लक्ष रूपये; सौर उर्जेवर चालणारा दुहेरी पंप योजना; व्यायामशाळेचे बांधकाम-१० लक्ष रूपये आदी कामे मंजूर करण्यात आली आहेत. यातील शाळा खोलीचे काम व संरक्षक भिंतीसह सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजनेचे लोकार्पण करण्यात आले. तर, उर्वरित कामांचे भूमिपुजन करण्यात आले. तसेच शाळा व परिसरात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले. विशेष म्हणजे हा कार्यक्रम भर पावसात झाला. यावेळी शेकडो महिला व ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते हे विशेष.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, देऊळवाडे गावाला सुजदे, आसोदा आदींसह अन्य गावांशी जोडणार्‍या रस्त्यांची कामे पूर्णत्वाला आलेली आहेत. गावात देखील झपाट्याने विकासकामे सुरू असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. गावातील मुंजोबा मंदिर परिसरात सभामंडप उभारण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. तर देऊळवाडेसाठी पाण्याची टाकी आणि जलवाहिन्यांची तरतूद सुध्दा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

कोणताही सण वा उत्सव हा सामाजिक एकोप्याचा संदेश देत असतो. गणेशोत्सवात एकाच गावात विविध मंडळांनी गणरायाची स्थापना करण्याऐवजी एकच गणपती बसविला तर ते केव्हाही उत्तम असते. यातून गावाची एकजूट दिसते. गावामधील ज्येष्ठ मंडळींनी ज्या पध्दतीने एकोपा दाखविला, त्याच पध्दतीने तरूणांनी देखील एकोपा दाखविण्याची गरज आहे. देऊळवाडकरांचा हा एक गाव एक गणपतीचा पॅटर्न स्तुत्य असून इतर गावांनी याचे अनुकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ना. पाटील यांनी याप्रसंगी गणेश मंडळाला दहा हजार रूपयांची देणगी सुध्दा जाहीर केली.

याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, कानळदा येथील शिक्षण संस्था चेअरमन प्रकाश सपकाळे, भोलाणे येथील अशोक सपकाळे, धामणगाव येथील किरण सपकाळे, देऊळवाडच्या सरपंच सरस्वतीबाई श्रावण सोनवणे, उपसरपंच सरूबाई अमृत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते मुकेश सोनवणे, राजू सोनवणे, सारिका सोनवणे, सुनंदा सोनवणे, उत्तम सोनवणे, गेंदालाल सोनवणे, पोलीस पाटील संतोष सोनवणे, भीमराव पाटील आदी मान्यवर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवसेनेचे संघटक तथा कोळी महासंघाचे अध्यक्ष मुकेश सोनवणे यांनी केले तर आभार सरपंच सारस्वतीबाई सोनवणे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

चिंताजनक : पाळधी खुर्द येथे आढळला डेंग्यूचा रुग्ण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापालिकेतील सत्तांतराबाबत पालकमंत्री व संपर्क प्रमुख हे अंधारात नव्हते : खा. संजय राऊत

June 12, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक भविष्य १२ ते १८ जून २०२३ !

June 11, 2023

भाजपमुळे महावितरण आर्थिक संकटात ; डॉ. नितीन राऊत

November 19, 2020

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंमध्ये दोन दिवसांत होणार चर्चा, दिपाली सय्यद यांचं ट्विट !

July 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group