धरणगाव (प्रतिनिधी) गावात साचलेल्या पाण्याची योग्य विल्हेवाट लवकरात लवकर लावण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील बाभूळगाव येथील ग्रामस्थांनी धरणगाव तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सदर प्लॉटींग भागात रहिवाशी आहोत घरा समोरच तलावासारखे पाणी तुंबलेल असते तरी आम्हाला समजत नाही हे गाव आहे कि गिरणा नदीचे धरण. सदर घरासमोर खूपन पाणी साचलेले असते. पावसाळा चालू झाला कि ४ ही महिने पाणी साचलेले असते सध्या कोरोना महामारी चालू आहे आणि डेंगू मलेरिया या सारखे आजार पाण्यामुळे उद्भवता तरी जर असे वा साचलेल्या पाण्यामुळे आजार उद्भवले तर याला जबाबदार कोण ? प्रशासन कि ग्रामपंचायत वारंवार अर्ज देऊन ग्रामपंचायतीत सांगून साचलेल्या पाण्याची विल्हेवाट होत नसल्याने येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आणि या कोरोना आजारामुळे आधीच लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि त्या साचलेले पाणी यात लोकांना अधिक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच भूमिगत गटारीचे नुकतेच ३ महिन्यापूर्वी काम झाले आहे. त्या गटारी ३ महिन्यातच पूर्णपणे ब्लॉक झाल्या आहे. योग्य पद्ध कामे झाले नाहीत, ग्रामस्थांना खूपच संकटाना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत बाभूळगाव याने सरकारी काम करताना सरकार ची फसवणूक करून आणि बोगस कामे केली आहेत. या भूमिगत गटारी आणि गावात साचेल्या पाण्याची योग्य ती चौकशी करून आणि जे बोगस आणि फसवेगिरीची कामे चालू आहे. त्याची लवकरात लवकर विल्हेवाट करावी, असे यात म्हटले आहे.