जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष अभिषेक शांताराम पाटील यांनी नेहमीप्रमाणे खमंग आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार राजूमामा भोळे यांनी विश्रामगृहाच्या गैरवापर केला हा आरोप धादांत खोटा आहे. त्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी. गैरवापर म्हणजे विनामूल्य विनापरवानगी राहणे असे कोणतेही कृत्य आमदार राजूमामा भोळे यांनी केलेले नाही.
कारण असे की पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आमदार भोळे यांनी सहा हजार रुपये चा चेक शासकीय खात्यात भरलेला आहे. याचाच अर्थ असा की शासकीय नियमाप्रमाणे शुल्क भरून आमदार निवास करत आहे. यात गैर वापर कुठे आहे हे सिद्ध करा अन्यथा आपण जाहीर माफी मागा लोकप्रतिनिधींना शासकीय विश्रामगृह वापरण्याचा शासकीय जीआर आहे. हे ज्यांचे लोकप्रतिनिधी बनण्याचे स्वप्न भंगले त्यांना काय ठाऊक असणार लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी शासकीय अधिकारी यांना खाजगी जागेत आथवा वा घरी येण्यास संकोच निर्माण होतो. त्यामुळे शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींना शासकीय विश्रामगृहावर सहजगत्या भेटू शकतात. तसेच कोरोना महामारी मध्ये अधिकाऱ्यांसोबत भेटी बैठका घेण्यासाठी सोयीचे व्हावे तसेच शहरामध्ये भोळे यांच्यामार्फत सेवाकार्य व शहरांमध्ये मदत कार्य सातत्याने सुरू होते. या सर्व बाबींवर सहज नियंत्रण मिळवता यावे त्यासाठी आमदार राजू मामा भोळे हे शासनाच्या नियमाप्रमाणे शुल्क भरून वास्तव्यास आहे. यात गैर वापर असल्यास आपण तो सिद्ध करून दाखवा भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून शासनाची सर्वतोपरी मदत व बचत केली आहे. आमदार राजूमामा भोळे हे सहा वर्षापासून आमदार आहेत. असे असताना या सुरक्षेचा वापर आजतागायत केलेला नाही. तसेच महापौर काळामध्ये शासकीय वाहनांचा वापर सुद्धा कधी महापौरांनी केलेला नाही कारण शासनाच्या व जनतेच्या जनतेच्या पैशावर डल्ला मारू संस्कृती भारतीय जनता पार्टीची नव्हे जनतेच्या कष्टाचा पैसा ज्या पतपेढी मध्ये ठेवला त्यामधून भाजपचे आमदार राजूमामा यांनी कर्ज कधी उचलले नाही.
जनतेची सेवा करण्याचा आम्ही आव आणत नसून प्रत्यक्ष कृती करून दाखवत असतो
राष्ट्रवादीचे माजी मंत्री माजी आमदार प्रतिष्ठा म्हणून सुरक्षारक्षक घेऊन मिरवत असतात ही खऱ्या अर्थाने शासनाच्या पैशाची उधळपट्टी आहे. आमदार राजू मामा भोळे हे विश्रामगृह शुल्क भरून राहतात. हे जगजाहीर आहे. तेथे राहून जनतेच्या व अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून जनतेची काम करतात. हे आपल्या पोटात दुखत आहे. का आपल्या सरकार मधील सागर पार्क चा भूखंड गैरव्यवहार बाहेर निघाला म्हणुन आपल्या जिव्हारी लागला आहे. आम्हाला समजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जळगाव मनपा मध्ये जनतेने आपल्या हाती भोपळा दिला तसेच २०१९ ला आपल्याला तिकीट मिळाले पण निवडून आले नाही याचे शल्य आपल्याला बोचत आहे म्हणून आपण तथ्यहीन आरोप करत असतात व प्रसिद्धी मिळवत असतात. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती पाहता २०२४ च्या निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळणार नाही हे नक्की आहे. पण प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम नक्की मिळेल याची खात्री आहे.