TheClearNews.Com
Thursday, April 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जल जीवन मिशन अंतर्गत विविध पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान

The Clear News Desk by The Clear News Desk
January 5, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद, बुलडाणा, अकोला आणि नाशिक जिल्ह्यातील विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही दुरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थिती लावून सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आणि या योजना वेळेत पूर्ण होतील आणि कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष देण्याची सूचना केली.

मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खासदार प्रताप जाधव, आमदार अंबादास दानवे, आमदार रायमुलवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविल्या जात आहेत. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी ओढाताण थांबावी यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

READ ALSO

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

आज झालेल्या कार्यक्रमात जानेफळ कळंबेश्वर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. मेहकर जि. बुलढाणा), चिंचोली व 30 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. खामगाव व शेगाव जि. बुलढाणा), पाडळी व 5 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. जि. बुलढाणा), 178 गावे पैठण ग्रीड पाणी पुरवठा योजना (ता. पैठण व औरंगाबाद जि. औरंगाबाद ), तेल्हारा व 69 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. तेल्हारा जि. अकोला, घाटपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. खामगाव जि. बुलढाणा) आणि घोटी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. इगतपुरी, जि. नाशिक) या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

जल जीवन मिशन अंतर्गत 178 गावे पैठण ग्रीड पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 307 कोटी आहे. सदर योजनेअंतर्गत पैठण व औरंगाबाद तालुक्यातील 178 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. योजनेच्या रू. 307 कोटी किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

जानेफळ कळंबेश्वर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 10 कोटी आहे. या योजनेअंतर्गत जानेफळ व कळंबेश्वर या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. योजनेच्या रू. 10 कोटी किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

जल जीवन मिशन अंतर्गत चिंचोली व 30 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 88 कोटी 35 लक्ष आहे. सदर योजनेअंतर्गत खामगाव व शेगाव तालुक्यातील 31 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या
रू. 88 कोटी 35 लक्ष किंमतीच्या निधीसही प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

पाडळी व 5 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 16 कोटी 09 लक्ष आहे. या योजनेअंतर्गत बुलढाणा तालुक्यातील 6 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या रू. 16 कोटी 09 लक्ष किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

तेल्हारा व 69 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 148 कोटी 43 लक्ष आहे. या योजनेअंतर्गत तेल्हारा तालुक्यातील 70 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या रू. 148 कोटी 43 लक्ष किंमतीच्या निधीसही प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

घाटपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 18 कोटी 78 लक्ष आहे. सदर योजनेअंतर्गत घाटपुरी या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या रू. 18 कोटी 78 लक्ष किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याशिवाय घोटी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या २२ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकिय मान्यता दिल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
Next Post

फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधून दागिने लांबविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले अवघे ४ कोरोनाबाधित, ४ झाले बरे !

September 2, 2021

जैन इरिगेशनचे येत्या वर्षात १००० कोटींचे निर्यातीचे उद्दीष्ट – अनिल जैन

September 30, 2025

लग्न करुन परतताना कालव्यात वाहन कोसळले ; 7 वऱ्हाडींचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी !

March 31, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जुलै 2025 !

July 17, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group