धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. २२ फेब्रुवारी २०२१ ते ०६ मार्च २०२१ पर्यंत धरणगाव शहरात खालील प्रमाणे आदेश लागू करण्यात आलेले आहे.
१. सर्व प्रकारच्या शाळा, शिकवणी, खाजगी क्लासेस बंद राहतील. (ऑनलाईन शिक्षण वगळून)
२. सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, जत्रा, दिंडी ई.कार्यक्रमांना बंदी असेल.
३. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे एका वेळेस केवळ १० व्यक्तींच्या उपस्थित पूजा अर्चा करणेसाठी खुली राहतील.
४. सर्व व्यायामशाळा, जिम बंद राहतील.
५. दि. २५/०२/२०२१ व ०४/०३/२०२१ रोजिचे आठवडेबाजार बंद राहतील.
६. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक कार्यमक्रमाना बंदी असेल.
७. लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रमांना केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी असेल. तथापि नगरपालिका, तहसील, पोलीस स्टेशन ची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. तसेच सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वतः ची काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे.