TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समतावादी साहित्य शिक्षक मंडळामार्फत आयोजित 14 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा, हा महाराष्ट्रातील उच्चांक : डॉ. श्रीपाल सबनीस

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जातिवाद पोसण्याचे काम राजकीय व्यवस्था करीत असून समतावादी साहित्य मंडळ सारख्या संस्था जातीव्यवस्था हद्दपार करण्यात योगदान देऊ शकतात. समतावादी साहित्य शिक्षक मंडळामार्फत आज झालेला 14 पुस्तकांच्या प्रकाशना सारखा सोहळा मी महाराष्ट्रात पाहीला नाही. जळगाव जिल्ह्यातील शिक्षक प्रचंड प्रतिभासंपन्न आहेत आणि आपल्या प्रतिभेचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करीत आहेत, ही अत्यंत भूषणावह बाब आहे. सदर सोहळा हा प्रकाशनाचा उच्चांक आहे. समतावादी साहित्य शिक्षक मंडळाच्या शिक्षकांनी अशाच प्रकारे समाजप्रबोधनासाठी लेखन करीत राहावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी समतावादी साहित्य शिक्षक मंडळामार्फत आयोजित केलेल्या भव्य पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी केले.

आपल्या मनोगतात डॉक्टर श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, सध्या परिस्थिती अत्यंत भयावह आहे. मानवी मूल्य हरपत चालली आहेत. धर्म राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे. प्रत्येक विचार धर्माच्या दृष्टिकोनातून पहिला जात आहे. आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध व ख्रिश्चन अशा धर्मा-धर्माच्या कंपार्टमेंटचे नागरिक न होता आता आम्हाला वैश्विक नागरिकत्वाची कास धरली पाहिजे. त्यासाठी माणसाने संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. जातीच्या भिंती ओलांडल्या पाहिजे आणि माणूसपण जपले पाहिजे. समतावादी साहित्य मंडळाचा सदर कार्यक्रम एस.एस.बी. टी. इंजिनिअरिंग कॉलेज, बांभोरी, जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

READ ALSO

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंचावर डायटचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे, बीएसएनएलचे सेवानिवृत्त अधिकारी मंगल शिरसाठ, राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब विश्वासराव पाटील, प्रशांत पब्लिकेशनचे संचालक प्रदीप पाटील, एरंडोलचे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील व मंडळाचे अध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ इत्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी खालील पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी सत्यशोधक आणि इतर कथा लेखक- प्रा. भरत आ. शिरसाठ एरंडोल, फिमेल कॅरॅक्टर्स इन शोभा डेज नाॅवेल्स -प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी पाचोरा, क्रांतीलहर काव्यसंग्रह-अजय भामरे अमळनेर, माझी सावित्रीमाई आणि आजची स्त्री-रंजना कोळी बेटावद जामनेर, मुलींचे शिक्षण व महिला सक्षमीकरण-प्रतिभा पाटील जळगाव, माता रमाई आंबेडकर – वर्षा शिरसाठ एरंडोल, स्वीट मोमेंट्स वीद द एन्जल्स-सपना रावलानी जळगाव, बालिका की शिक्षा मे शिक्षिकाओंकी भूमिका- सरिता वासवानी भुसावळ, समतेचे शिलेदार-शंकर भामेरे-(पहूर)जामनेर, स्री- पुरुष समानता- वर्षाताई अहिरराव- जळगाव, माझे गुरू-माझे कल्पतरू वर्षाताई अहिरराव जळगाव, बेसिक इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश फनाॅलाॅजी-भारती ठाकरे (शिरसोली)जळगाव, इंडिया- बांगलादेश टेलीकोलाबोरेशन प्रोजेक्ट-वर्षाताई अहिरराव जळगाव, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अमेंडमेंट ॲक्ट-ॲड.ऐश्वर्या आठवले भुसावळ.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समतावादी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक भरत शिरसाठ यांनी केले. सूत्रसंचालन मंडळाचे कोषाध्यक्ष रणजित सोनवणे, सचिव एस ये पाटील व प्रमोद आठवले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मंडळाचे सदस्य संजय बारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रणजीत सोनवणे, वर्षा अहिरराव, हेमेंद्र सपकाळे, जीवन शिरसाठ, डॉक्टर सैंदाणे, शैलेश शिरसाठ, विनोद सपकाळे व शरद धनगर आदींनी परिश्रम घेतले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
Next Post

चोपडा महाविद्यालयात ताण तणाव व्यवस्थापनावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा परिषद शाळांचे रूप पालटणार, बळकटीकरणासाठी पालकमंत्र्यांनी मंजूर केला ४ कोटी ५३ लाखांचा निधी !

December 17, 2023

महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याला आरोपीला गुजरातमधून अटक

January 7, 2021

तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे २४ मे रोजी ऑनलाईन आयोजन

May 21, 2021

‘भाषणं करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत’ : रक्षा खडसे

November 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group