TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदियास संयुक्त विजेतेपद ; महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडलांच्या संघांनी संयुक्तरीत्या सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळविला.

येथील एकलव्य क्रीडा संकुलावर रविवारी (५ फेब्रुवारी) चारदिवसीय स्पर्धेचा समारोप झाला. सर्वाधिक ६२ गुण मिळविणाऱ्या पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडलांच्या संघांना सर्वसाधारण विजेतेपद विभागून देण्यात आले. महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या हस्ते विजेत्यांना करंडक प्रदान करण्यात आला. यावेळी इतर संघ व उपस्थितांनीही टाळ्यांचा गजर व जल्लोष करीत विजेत्या संघांचे कौतुक केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, कार्यकारी संचालक (वितरण/मानव संसाधन) अरविंद भादीकर, स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता कैलास हुमणे (जळगाव), भुजंग खंदारे (मुख्यालय), राजेंद्र पवार (पुणे), मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी अधीक्षक अभियंता राजेंद्र मार्के (जळगाव), अनिल बोरसे (नंदुरबार), कैलास जमदडे (अहमदनगर), सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) नेमीलाल राठोड, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) देवेंद्र कासार, अमित सोनवणे, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध नाईकवाडे, रमेशकुमार पवार, प्रदीप सोरटे, राम चव्हाण, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक श्रीकृष्ण बेलोरकर, अनुभूती शाळेचे क्रीडा संचालक अरविंद देशपांडे हेही मंचावर होते. सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांनी बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर यांनी आभार मानले.

READ ALSO

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

पाहुण्यांच्या हस्ते सांघिक व वैयक्तिक खेळातील विजेते व उपविजेत्यांना सुवर्ण व रौप्यपदक तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्यातील १६ परिमंडलांचे नाशिक-जळगाव, औरंगाबाद-लातूर-नांदेड, कल्याण- रत्नागिरी, सांघिक कार्यालय-भांडूप, नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, अकोला-अमरावती, पुणे-बारामती व कोल्हापूर अशा ८ संयुक्त संघांतील ७३० पुरुष व ३५३ महिला असे एकूण १०८३ खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. सांघिक खेळांचे अंतिम निकाल – अनुक्रमे विजेता व उपविजेता : क्रिकेट – पुणे-बारामती व नाशिक-जळगाव, व्हॉलिबॉल – कोल्हापूर व औरंगाबाद-नांदेड-लातूर, कबड्डी (पुरुष)- सांघिक कार्यालय-भांडूप व कोल्हापूर, कबड्डी (महिला)- सांघिक कार्यालय-भांडूप व पुणे-बारामती, खो-खो (पुरुष)- पुणे-बारामती व कोल्हापूर, खो-खो (महिला)- सांघिक कार्यालय-भांडूप व कोल्हापूर, टेबल टेनिस (पुरुष)- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व कोल्हापूर, टेबल टेनिस (महिला)- अकोला-अमरावती व कोल्हापूर, बॅडमिंटन (पुरुष)- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व औरंगाबाद-नांदेड-लातूर, बॅडमिंटन (महिला)- पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, कॅरम (पुरुष)- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व पुणे-बारामती, कॅरम (महिला)- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व कोल्हापूर, ब्रिज- औरंगाबाद-नांदेड-लातूर व नाशिक-जळगाव, टेनिक्वाईट महिला- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व औरंगाबाद-नांदेड-लातूर.

वैयक्तिक खेळांचे अंतिम निकाल (कंसात संघ) -अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे – १०० मीटर धावणे – पुरुष गट – साईनाथ मसने (सांघिक कार्यालय-भांडूप) व गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती), महिला गट – प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप) व सरिता सरोटे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), २०० मीटर धावणे – पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) व साईनाथ मसने (सांघिक कार्यालय-भांडूप), महिला गट – सरिता सरोटे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व भूमिका भोयर (कोल्हापूर), ४०० मीटर धावणे – पुरुष गट – विजय भारे (नाशिक-जळगाव) व प्रदीप वंजारे (कोल्हापूर), महिला गट – श्वेतांबरी अंबाडे (औरंगाबाद-नांदेड-लातूर) व अश्विनी शिंदे (सांघिक कार्यालय-भांडूप), ८०० मीटर धावणे – पुरुष गट – प्रतीक वाईकर (पुणे-बारामती) व परेश चौधरी (नाशिक-जळगाव), महिला गट – श्वेतांबरी अंबाडे (औरंगाबाद-नांदेड-लातूर) व प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप), १५०० मीटर धावणे – पुरुष गट – प्रतीक वाईकर (पुणे-बारामती) व शुभम मात्रे (अकोला-अमरावती), महिला गट- अर्चना भोंग (पुणे-बारामती) व प्रेरणा रहाटे (सांघिक कार्यालय-भांडूप), ५००० मीटर धावणे – पुरुष – प्रफुल्ल राऊत (कल्याण-रत्नागिरी) व सचिन खटावकर (कोल्हापूर), ४ बाय १०० रिले – पुरुष गट – प्रदीप वंजारे, शुभम निंबाळकर, नरेश सावंत, संभाजी जाधव (कोल्हापूर) व प्रतीक वाईकर, सोमनाथ कांतीकर, कृष्णा लाड, गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती), महिला गट – प्रिया पाटील, सोनिया मिठबावकर, अश्विनी शिंदे, सारिका जाधव (सांघिक कार्यालय-भांडूप) व सुप्रिया लुंगसे, अर्चना भोंग, शर्वरी तिवटणे, माया येळवंडे (पुणे-बारामती), गोळा फेक – पुरुष गट – प्रवीण बोरावके (पुणे-बारामती) व हणमंत कदम (कोल्हापूर), महिला गट – स्नेहा सपकाळ (सांघिक कार्यालय-भांडूप) व पूजा ऐनापुरे (कोल्हापूर), थाळी फेक – पुरुष गट – प्रवीण बोरावके (पुणे-बारामती) व धर्मेश पाटील (नाशिक-जळगाव), महिला गट- ज्योती कांबळे (कोल्हापूर) व संगीता यादव (औरंगाबाद-नांदेड-लातूर), भाला फेक – पुरुष गट – सचिन चव्हाण (कोल्हापूर) व नारायण मुंजाळ (औरंगाबाद-नांदेड-लातूर), महिला गट – सरिता सरोटे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व अश्विनी जाधव (कोल्हापूर), लांब उडी – पुरुष गट – सोमनाथ कांतीकर (पुणे-बारामती) व मनोज धोंडगे (नाशिक-जळगाव), महिला गट – सरिता सरोटे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व माया येळवंडे (पुणे-बारामती), उंच उडी – पुरुष गट – चेतन केदार ( नाशिक-जळगाव ) व महेश नागटिळक (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), महिला गट – सोनाली मोरे (सांघिक कार्यालय-भांडूप) व अश्विनी देसाई (कोल्हापूर), बुद्धिबळ- पुरुष गट – अजय पंडित (पुणे-बारामती) व सौरभ माळी (कोल्हापूर), महिला गट – अमृता जोशी (सांघिक कार्यालय-भांडूप) व मोना बरेला (नाशिक-जळगाव), कॅरम – पुरुष गट – अनंत गायत्री (सांघिक कार्यालय-भांडूप) व इक्बाल खान (औरंगाबाद-नांदेड-लातूर), महिला गट – तेजश्री गायकवाड (सांघिक कार्यालय-भांडूप) व पुष्पलता हेडाऊ (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), टेनिक्वाईट – महिला एकेरी – लीना पाटील (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व मनीषा चौकसे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), महिला दुहेरी – शीतल नाईक- कोमल सुरवसे (पुणे-बारामती) व पल्लवी गायकवाड-भाग्यश्री कदम (औरंगाबाद-नांदेड-लातूर), टेबल टेनिस – पुरुष एकेरी – रितेश सव्वालाखे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व शकील शेख (कोल्हापूर), पुरुष दुहेरी – रितेश सव्वालाखे – प्रमोद मेश्राम (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व मंगेश प्रजापत-कैलास जमदडे (नाशिक-जळगाव), महिला एकेरी – स्नेहल बढे (अकोला-अमरावती) व अश्विनी शिंदे (सांघिक कार्यालय-भांडूप), महिला दुहेरी- स्नेहल बढे-मनीषा बुरांडे (अकोला-अमरावती) व अश्विनी शिंदे-सायली कांबळे (सांघिक कार्यालय-भांडूप), बॅडमिंटन – पुरुष एकेरी – पंकज पाठक (औरंगाबाद-नांदेड-लातूर) व लोकेश तळवेकर (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), पुरुष दुहेरी – पंकज पाठक-चेतन चौधरी (औरंगाबाद-नांदेड-लातूर) व इम्रान तासगावकर-गणेश काकडे (पुणे-बारामती), महिला एकेरी – वैष्णवी गांगारकर (पुणे-बारामती) व ऋतिका नायडू (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), महिला दुहेरी – वीणा सगदेव- ऋतिका नायडू (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व विदुला पाटील-चैत्रा पै (कोल्हापूर), ब्रिज- पंकज आखाडे-महेश मेश्राम (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व प्रशांत गोंधळेकर-प्रशांत गायकवाड (अकोला-अमरावती), कुस्ती – ५७ किलो – आकाश लिंभोरे (पुणे-बारामती) व गोरख रानगे (कोल्हापूर), ६१ किलो – विनोद गायकवाड (अकोला-अमरावती) व सुखदेव पुजारी (कोल्हापूर), ६५ किलो – राजकुमार काळे (पुणे-बारामती) व सूर्यकांत गायकवाड (नाशिक-जळगाव), ७० किलो – उत्तम पाटील (कोल्हापूर) व महादेव दहिफळे (औरंगाबाद-नांदेड-लातूर), ७४ किलो -गुरुप्रसाद देसाई (औरंगाबाद-नांदेड-लातूर) व अकील मुजावर (पुणे-बारामती), ७९ किलो – संदीप नेवारे (अकोला-अमरावती) व युवराज निकम (कोल्हापूर), ८६ किलो – अमोल गवळी (पुणे-बारामती) व भूषण चौधरी (नाशिक-जळगाव), ९२ किलो – वैभव पवार (पुणे-बारामती) व महेंद्र कोसारे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) , ९७ किलो – मोहंमद अन्वर (अकोला-अमरावती) व प्रमोद ढेरे (कोल्हापूर) आणि १२५ किलो – भानुदास विसावे (नाशिक-जळगाव) व हणमंत कदम (कोल्हापूर).

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
Next Post

धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी जी.डी.पाटील यांची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सभागृहात गैरवर्तन केल्याप्रकरणी गिरीश महाजनांसह १२ आमदार निलंबित !

July 5, 2021

ब्रेकिंग न्यूज : तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक !

February 23, 2022

आठ वर्षाच्या मुलीसमोर पोलिसाने लगावली बापाच्या कानशिलात !

December 8, 2021

दुर्दैवी घटना : राज्यात वीज पडून सहा जण ठार !

April 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group