अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर बसस्थानक आवारात महिला बस वाहकाला कारण नसतांना अचानक धक्का दिल्याचा जाब विचारल्याचा रागातून एकाने शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता घडला आहे. याप्रकरणी सकाळी १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर बसस्थानकातील बस क्रमांक (एमएच २० बीटी २३६१) वर महिला चालक म्हणून एक महिला नोकरीला आहे. सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता महिला वाहक ह्या बसमध्ये असतांना संशयित आरोपी इमरान उर्फ गुड्डू मोहम्मद अस्लम (वय ३८ रा. खडका रोड, भुसावळ) याने महिला वाहका काहीही कारण नसतांना धक्का दिला. याचा जाब विचारला असता संशयित आरोपी इमरान अस्लम याने शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर महिले वाहक यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी इमरान उर्फ गुड्डू मोहम्मद अस्लम याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहे.