धामोड (वृत्तसंस्था) शुल्लक कारणावरुन झालेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि त्यात एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना समोर आली आहे. कुंभारवाडीत ही घटना घडली आहे. तंबाखूसाठी चुना मागितल्याने एका व्यक्तीवर धारदार चाकुने वार करत हत्या (murder with sharp weapon) करण्यात आली आहे. याबाबत राधानगरी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे .
राधानगरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जितेंद्र खामकर व विकास कुंभार या दोघांच्यामध्ये रात्री चुना मागण्याच्या कारणावरून मारामारी झाली. हा वाद मिटवण्यासाठी जितेंद्र खामकर याने मामा अनिल रामचंद्र बारड याला बोलावुन घेतले. रात्री ११ वाजता ते दोघेजण कुंभारवाडी येथे गेले असता आरोपी विकास कुंभार याने जवळ असलेल्या धारदार चाकुने अनिल बारड यांच्यावर दोन वार केले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला.
विकास कुंभार याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आधिक तपास पोलिस निरीक्षक एस. एस. कोळी व पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे करत आहेत. अनिल बारड हे कोल्हापूर जिल्हा संघात गोकुळ शिरगांव शाखेत मॅनेजर म्हणुन काम करत होते.