चाळीसगाव (प्रतिनिधी) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी आज सकाळी चाळीसगाव येथे बौद्ध बांधवांना धावती भेट दिली व समाजाच्या विविध विषयांवर चर्चा केली.
याप्रसंगी धर्मभुषण बागुल (राष्ट्रीय प्रचारक भारतीय बौद्ध महासभा), माजी आमदार साहेबराव घोडे, भैय्यासाहेब ब्राम्हणे, सोनाली लोखंडे व तरुण कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. व अनेक विषयांवर चर्चा केली. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा व तालुका कार्यकारिणी तयार करणे बाबत देखील चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी माजी नगरसेवक मंगेश बापू पाटील यांनी चाळीसगाव शहरतर्फे राजरत्न आंबेडकर यांचे स्वागत केले. समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष स्वप्नील जाधव, सागर निकम, संदीप निकम, विजय घोडे, बाबा पगारे, विशाल पगारे, तुषार मोरे, भागवत बागुल, आकाश देशमुख, संपत कर्डक, विशाल अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
लवकर राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभेची जिल्हास्तरीय बैठक जळगाव येथे आयोजित केली जाणार असल्याची माहिती धर्मभुषण बागुल (राष्ट्रीय प्रचारक भारतीय बौद्ध महासभा) यांनी दिली.