TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शायर मूनव्वर राणाचे वादग्रस्त वक्तव्य : जळगावात संतप्त प्रतिक्रिया

The Clear News Desk by The Clear News Desk
August 20, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) देशातील प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांनी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची तुलना तालिबान्यांशी करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जळगावात याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शनीपेठ पोलीस ठाण्यात नगरसेवक कैलास सोनवणे यांनी गुन्हा दाखल केला असून सायंकाळी आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे पुतळा दहन करण्यात आला. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे.

शायर मूनव्वर राणा यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महर्षी वाल्मिकी यांना दरोडेखोर संबोधत त्यांची तुलना तालिबान्यांशी केली आहे. तसेच ‘आपके लोग किसी को भी भगवान बना देते है’ असे म्हणून त्यांनी समस्त हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे. आजवर ज्या देशवासीयांनी मुनव्वर राणा यांना डोक्यावर घेतले तेच राणा आता हिंदू धर्माविरुद्ध गरळ ओकत सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मुनव्वर राणा यांच्या वक्तव्यामुळे देशातील सामाजिकता आणि एकात्मता भंग होण्याची शक्यता आहे. मुनव्वर राणा यांचा जळगावात निषेध करण्यात आला असून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल

मूनव्वर राणा यांच्या विरुद्ध नगरसेवक कैलास सोनवणे यांनी शनीपेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात दाद मागण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

माजी महापौरांच्या हस्ते पुतळा दहन

जळगाव शहरातील महर्षी वाल्मिक चौकात वाल्मिक लव्य सेना आणि महर्षी वाल्मिक बहुउद्देशीय मंडळातर्फे मूनव्वर राणा यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. माजी महापौर भारती सोनवणे यांनी पुतळा दहन केला. यावेळी राणाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

शायर मूनव्वर राणा यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे. शायर मूनव्वर राणा यांनी ‘आप लोग किसी को भी भगवान बना लेते हैं’ असे वक्तव्य करीत केले आहे. मूनव्वर खान यांनी आजवरच्या हिंदू धर्मियांच्या भावना आणि परंपरागत मान्यतेवर टीका केली आहे. हिंदू धर्मियांचा हा अपमान असून देवी, देवतांच्या अस्तित्वावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मूनव्वर खान यांनी धार्मिक भावना दुखावल्या असून त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र, पालकमंत्री जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव यांना पाठविण्यात आली आहे.

यांची होती उपस्थिती

मूनव्वर राणा यांच्याविरुद्ध तक्रार देताना आणि इतर प्रसंगी माजी महापौर भारती सोनवणे, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, मुकुंदा सोनवणे, किशोर बाविस्कर, दत्तात्रय कोळी, आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे मोहन शंखपाळ, भरत सपकाळे, निलेश तायडे, रोहिदास ठाकरे, कमलेश सपकाळे, भैय्या पाटील, किशोर सोनवणे, ललित सोनार, युगल सोनार, विष्णू ठाकरे, मनोज रायसिंगे आदींसह इतर संतप्त नागरिक उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : सुनील झंवरकडून तपासात निषपन्न झाल्या अनेक महत्वपूर्ण गोष्टी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आशादीप वसतिगृह प्रकरणी खोटारडे उघडे पडले ! : दिलीप तिवारी

March 4, 2021

ठाकरे सरकार पूर्णपणे असंवेदनशील ; राष्ट्रीय महिला आयोगाने फटकारले

September 12, 2021

सावदा येथील परदेशी कुटूंबियांचे महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी केले सात्वंन

August 7, 2021

महावितरण आणि पुरवठा विभागांनी समन्वय ठेवून तात्काळ पाणीपुरवठा योजनांच्या वीज जोडणी पूर्ण कराव्यात – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group