जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ७६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १६८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १९, जळगाव ग्रामीण-०२, भुसावळ-०१, अमळनेर-००, चोपडा-०४, पाचोरा-०४, भडगाव-००, धरणगाव-०२, यावल-०५, एरंडोल-०१, जामनेर-०७, रावेर-०५, पारोळा-०४, चाळीसगाव-२०, मुक्ताईनगर-०१, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण ७६ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४१ हजार ५२२ पर्यंत पोहचली असून १३७ हजार ०३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५६२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १९२१ रुग्ण सध्या उपचार घेताय.