जळगाव (प्रतिनिधी) आज सांयकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने ४९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून आज ६६० कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात करत सुखरुप घरी पोहोचले आहेत. यामुळे जळगावकरांना गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळत आहे.
आजची आकडेवारी
जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर- १४७ , जळगाव ग्रामीण- २४, भुसावळ-१६९ ; अमळनेर-१४ ; चोपडा- १२; पाचोरा-१४ ; भडगाव-०२ ; धरणगाव- ०३; यावल- १०; एरंडोल- ०८; जामनेर-११ ; रावेर-०२ ; पारोळा- ०६; चाळीसगाव-४१ ; मुक्ताईनगर-१७; बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यांमधील ०१ असे एकुण ४९२ रूग्ण आढळून आले आहेत.