पाळधी (प्रतिनिधी) मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, तसेच प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घेऊन या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पाळधी येथे साठघर मोहल्ला येथे नवीन मतदार नोंदणीचे आयोजन दानिश पठाण यांनी केलेले आहे. सर्व जागृत मतदार बघून बंधू-भगिनींनी बी. एल. ओ. शी संपर्क साधून मतदार यादीत नावं नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, नायब तहसीलदार श्री. सातपुते, पवार साहेब,व मंडल अधिकारी व तलाठी, माजी पं. स. सभापती मुकुंदराव नन्नवरे, माजी सरपंच अरुण पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सरपंच सचिन, पवार,नारायणअप्पा सोनावणे, हाजी फिरोज पठाण, हाजी सुलतान पठाण, अहमद सेठ, शय्यु खान, सारफराज खान, विजू पाटील, प्रकाश पाटील, उपसरपंच चंदन कळमकर, विक्कीदादा पाटील, धर्मेंद्र कुमार,शकील खान यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
- जन्मतारखेचा पुरावा खालीलपैकी कोणताही एक जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड
3.पत्त्याचा पुरावा खालीलपैकी कोणताही एक
रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक, लाईट बिल, भाडे करारनामा, गॅस कनेक्शन