धरणगाव (प्रतिनिधी) आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त व भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षनिमित्त महसूल विभागातर्फे बांभोरी प्र.चा.गावात स्वछता व पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना मोफत डिजिटल ७/१२ उतारा, संजय गांधी निराधार योजनेची मंजूर प्रकरणे तसेच रेशन कार्डचे नुकतेच वाटप करण्यात आले.
तसेच गिरणा नदीच्या पुरात मृत्युमुखी पडलेल्या पंढरीनाथ सपकाळे यांच्या कुटुंबातील व्यक्तींना ४ लाख रुपयांचा धनादेश, पिठाची गिरणी व १ महिन्याचे रेशन पालकमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले.
सदर कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंकजकुमार आशिया, जळगाव उपजिल्हाधिकारी महाजन, एरंडोल प्रांत अधिकारी गोसावी, धरणगाव तहसीलदार देवरे, धरणगाव नायब तहसीलदार सातपुते, बांभोरी प्र.चा. सरपंच सचिन बिऱ्हाडे, धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र शेठ नन्नवरे, बांभोरी माजी सरपंच ईश्वर शेठ नन्नवरे, पाळधी पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा, आव्हाने सरपंच सदाशिव पाटील, मंडळ अधिकारी अमोल पाटील, तलाठी गजानन बिंडवाल, बांभोरी ग्रामसेवक दीपक पाठक, बांभोरी तलाठी कार्यालय नारायण सोनवणे, तसेच गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, कोतवाल, कर्मचारी, शेतकरी व गावातील सर्व माजी सरपंच व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, युवक, महिला यांची प्रमुख उपस्थिती होती.