मुंबई (वृत्तसंस्था) अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी तळोजा तुरंगात अटकेत असलेला मुंबई पोलिसांतील सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझेची मंगळवारी मुंबई पोलिसांतून हकालपट्टी करण्यात आली आहे. ते मुंबई पोलिसात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून तैनात होते.
मुंबईत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही सापडली होती. त्यानंतर ही गाडी ज्यांची होती. त्या मनसुख हिरेनची रहस्यमयपणे हत्या करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरु केली. सचिन वाझे यांना आरोपी म्हणून अटक केली. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी निलंबित केले आहे.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, पोलीस आयुक्त हेमंत नांगराळे यांच्या आदेशानुसार सचिन वाझे यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. एका उच्च अधिकाऱ्यांने सांगितले की, “एपीआय सचिव हिंदुराव वाझे यांना पोलीस सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीतील ३११ (२) (बी) अन्वये यासंदर्भात आदेश जारी केला आहे.