जळगाव (प्रतिनिधी) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलींची) जळगाव येथे हॅण्ड टुल मशीन, यंत्र सामुग्री, फर्निचर, खुर्ची आदि साहित्य निर्लेखित करण्यात आले आहे. हे निर्लेखन झालेले साहित्य ३० सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत संस्थेत सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत बघावयास मिळेल.
तरी ज्यांना हे साहित्य घ्यावयाचे आहे त्यांनी वरील वेळेत संस्थेमध्ये (सुट्टीचे दिवस सोडून) येवून निर्लेखन यादीप्रमाणे साहित्य पाहून दरपत्रक भरावे. असे आवाहन राजश्री पाटील, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), जळगाव यांनी केले आहे. दरपत्रकाच्या अटी व शर्ती संस्थेत बघावयास मिळतील असेही पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.