TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलांचे धाडस, कर्तृत्वाला सलाम…महिला गोविंदा पथकाने फोडली मानाची दहीहंडी !

नारी शक्तीला भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनचे प्रोत्साहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2023
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ढोल ताशांचा गजर…शिवतांडवातुन शिवशक्ती जागर…अन् रोप व पोल मल्लखांबांची चित्तथरार प्रात्यक्षिके…त्याला मधुरभक्ती गितांची मैफलीची साथ.. आणि गोविंदा रे गोविंदा…जय घोष करत महिलांचे एकावर एक मानवी मनोरे…व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ने महिलांचे धाडस, साहस, आत्मविश्वासाची प्रचिती जळगावकरांनी अनुभवली.

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे आयोजित तरूणींसाठी दहीहंडी उत्सवात एनसीसी, नुतन मराठा महाविद्यालय, विद्या इंग्लीश स्कूल यांना दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. यात एनसीसी, नुतन मराठा महाविद्यालय यांनी दहिहंडी फोडली. विशेष पालखीने कृष्ण भगवान साकारलेला चिमुकला अथांग अजय डोहळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

काव्यरत्नावली चौकातील तरूणींची दहीहंडी प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, पोलीस अधिक्षक मेघनाथन राजकुमार, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, एनसीसीचे कमांडींग ऑफिसर कर्नल अभिजित महाजन, लेफ्टनंट कर्नल पवन कुमार,अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, प्र.डीवायएसपी सतिष कुलकर्णी, विकास पवार, जैन इरिगेशनचे अनिल जोशी, स्वरूप लुंकड, अशोक कावडीया, डॉ. कल्याणी गुट्टे, पारस राका, विराज कावडीया, राजेश नाईक उपस्थित होते.

दहीहंडी उत्सवाचे हे होते विशेष आकर्षण !
विवेकानंद व्यायाम शाळेतर्फे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यासह शिवतांडव व शोर्यवीर या दोन्ही ढोलताशा पथकातील सुमारे २७५ ढोलताशा वादकांनी आपल्या कलाकृती सादर केली. मल्लखांब प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २० विद्यार्थ्यांनी रोप मल्लखांब, पोल मल्लखांब चे चित्तथरारक सादरीकरण करून जळगावकरांची मने जिंकली.

सांस्कृतिक नृत्यासह, राधा-कृष्ण वेषभुषा स्पर्धा !
महिलांची दहिहंडीत अनुभूती शाळा, जी. एच. रायसोनी पब्लीक स्कुल, रूस्तमजी इंटरनॅशनल, किडस् गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल, इपिक डान्स स्टुडिओ तर्फे सांस्कृतिक नृत्य सादर केले. ५ ते १२ वर्ष वयोगटातील बाळगोपाळांसाठी राधा-श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्फूर्त सहभाग होता.

महोत्सवाच्या यशस्वितेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया, दहीहंडी उत्सवाच्या अध्यक्षा संस्कृती नेवे, उपाध्यक्षा मेघना भोळे, यामिनी कुळकर्णी, सचिव पियुष तिवारी, सहसचिव हर्षल मुंडे, खजिनदार अर्जुन भारूळे, सागर सोनवणे, शुभम पुश्चा, प्रितम शिंदे, तृषांत तिवारी, पियुष हसवाल, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, पियुष तिवारी, यश राठोड यांच्यासह जैन इरिगेशन सिस्टीम लि.च्या सहका-यांनी परिश्रम घेतले.

‘त्या नाहीतर कोण…’ इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांना सलाम !
चांद्रयान-3 यशस्वी झाले. त्यात महिलांचे योगदान महत्त्वाचे होते. इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ डाॕ. रितु श्रीवास्तव, नंदिनी हरिनाथ, अनुराधा टि. के., मिनल रोहित, मऊ मिता दत्त, टेसी थाॕमल्स, व्हि. आर. लली थांबिका, मुथ्या विनिथा यांच्या सन्मानार्थ ‘त्या नाहितर कोण..’ ही थिम घेऊन दहीहंडीत विशेष मानाचे स्थान देण्यात आले होते. चंद्राची प्रतीकृती साकारून महिलां शास्त्रज्ञाचे प्रेरणादायी छायाचित्रे सिता-यांमध्ये दाखविण्यात आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
Next Post

भुसावळात विजेचा शॉक लागल्याने वृध्द महिलेचा मृत्यू ; ईईएसएल कंपनीच्या एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाळूमाफियांची दादागिरी : तहसीलदारांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न, मंडळ अधिकाऱ्यालाही चालत्या ट्रॅक्टरवरून ढकलले !

June 13, 2023

रोहिणी खडसेंना अटक करा ; शिवसेनेचे मुक्ताईनगरमध्ये ठिय्या आंदोलन

December 26, 2021

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक करणार

November 21, 2020

अनोरे विद्यालयात विद्यार्थी झाले लसवंत

January 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group