धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साळवे इंग्रजी विद्यालयात दहावी 2006 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन नुकतेच रंगले. यावेळी ग्राम सुधारणा मंडळाचे चेअरमन डॉ. गिरीशदादा नारखेडे व संचालक मंडळ, मुख्याध्यापक ए.एस. पाटील सर, शाळेचे आजी व शिक्षक – शिक्षिका, तसेच आजी माजी शिक्षकेतर कर्मचारी, शिपाई यांना निमंत्रित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपले गुरुजन यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांचा ट्रॉफी ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थीनींनी शाळा, शिक्षक यांच्या विषयीच्या आदर व भावना व्यक्त केल्या. शाळेच्या परिसरातील जुन्या आठवणी पुन्हा समोर आल्याचा भास सर्वांना होऊ लागला होता. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी अनेक मनोरंजनात्मक खेळ खेळायला सुरुवात केली. त्यांना पाहून शिक्षकांनाही खेळायचा मोह आवरला गेला नाही व तेही विद्यार्थ्यांमध्ये खेळात सामील झाले.
स्नेहभोजन मध्ये शेव भाजी, भरीत, कळण्याची भाकरी, पनीर भाजी, पुलाव, काजुकतली इ०असा खुसखुशीत व लज्जतदार मेनू होता. कार्यक्रमाचा निरोप घेतांना विद्यार्थ्यांनी चेअरमन, संचालक, मुख्याध्यापक व शिक्षक आणी शिक्षकेतर कर्मचारी यांनी वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या व सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योती राणे मॅडम यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी मयूर चोपडा व आसिफ शाह यांनी पुढाकार घेतला.