TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘सारथी’ करणार स्पर्धा परीक्षेचे ऑनलाईन नि:शुल्क मार्गदर्शन

व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
June 2, 2021
in जळगाव, जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणेतर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब (अराजपत्रित), सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन नि:शुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच अध्यक्ष अजित निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे सारथी संस्थेच्या मुख्यलयाच्या इमारतीसाठी पुणे शहरातील शिवाजीनगर भाबुर्डा मधील ४१६३ चौरसमीटर जमीन मुख्य रस्त्यालगत मिळाली आहे. तसेच संस्थेस ४१ अधिकारी व कर्मचारी मंजूर केले आहेत. त्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

सारथी संस्थेमार्फत एम.फील/पीएच.डी करीता ‘छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-2020) मुलाखतीस सर्व उपस्थित एकूण २०७ विद्यार्थ्याची निवड करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. तसेच ३४ अनुपस्थित उमेदवारांना मुलाखतीस एक अधिकची संधी देण्याचे ठरले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक या पदांसाठी दरवर्षी अंदाजित पाचशे रिक्त जागा घोषित होतात. त्यासाठी सारथी, पुणेमार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ‘ब’ (अराजपत्रित) साठी संयुक्त (पूर्व) ब (मुख्य) परीक्षांसाठी लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदारांना ऑनलाईन निःशुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच केंद्रीय कर्मचारी निवड आयोगामार्फत अराजपत्रित (गट ब व गट क) पदांसाठी २०२०-२१ मध्ये अंदाजित २० हजार रिक्त पदे जाहीर झाली. त्यासाठी ‘सारथी’ पुणेतर्फे केंद्रीय कर्मचारी निवड आयोगामार्फत अराजपत्रित (गट ‘ब’ व गट ‘क’) पदांच्या परीक्षापूर्व तयारीसाठी लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदारांना ऑनलाईन निःशुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (Maharashtra Engineering Services) परीक्षेद्वारे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांची निवड केली जाते. या परीक्षा दर वर्षी आयोजित होतात. त्यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेद्वारे (CET) लक्षित गटातील २५० उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत आयोजित महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षा (Civil Judge Jr. Division & Judicial Magistrate First Class) साठी सन २०२० मध्ये ७४ रिक्त पदे जाहीर झाली. त्यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेद्वारे (CET) लक्षित गटातील एकूण ४०० उमेदवारांना मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. सारथी, पुणे मार्फत प्रायोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा कोचिंग तुकडी २०१९-२० मधील MPSC पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी कोचिंग व हजेरीवर आधारित तीन महिन्यांचे विद्यावेतन एकूण २४ हजार अथवा एकरकमी आर्थिक सहाय्य १५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी कोणताही एक आर्थिक लाभाचा पर्याय विद्यार्थी स्वतःच्या आवडीनुसार निवड करू शकणार आहेत.

सारथी संस्थेसाठी घोषवाक्य स्पर्धा भरविण्यात आली होती. त्यात ९४८ जणांनी सहभाग नोंदविला होता. मागविलेल्या घोषवाक्यांपैकी संचालक मंडळाने ‘शाहू विचारांना देवू या गती, साधू या सर्वांगीण प्रगती’ या घोषवाक्यची निवड झाली. हे घोषवाक्य जगदीश विष्णू दळवी यांनी पाठविले होते. स्पर्धेच्या निकषानुसार सारथी संस्थेतर्फे त्यांना १० हजार रुपयांचा धनादेश देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काकडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

महावितरणचे ‘मिशन आयपीडीएस’ यशस्वी तब्बल २५४ शहरांना दर्जेदार वीजपुरवठा सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संघ, भाजप हेच संविधान विरोधी : मल्लिकार्जुन खरगे !

July 4, 2024

धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : जाऊन घ्या…’मविआ’ प्रणीत ‘शेतकरी’ पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची यादी !

April 20, 2023

जिल्ह्यात आज आढळले ४६ कोरोनाबाधित, ५२ झाले बरे !

February 5, 2021

मतभेद मिटता-मिटता पुन्हा उफाळले; राज्यपाल नियुक्त १२ जागांचे प्रस्ताव लांबणीवर

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group