TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

१७ ऑगस्टपासून ग्रामीण आणि शहरी भागात वाजणार शाळेची घंटा

The Clear News Desk by The Clear News Desk
August 10, 2021
in राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाची लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याबाबत आज महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना व त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. १७ ऑगस्टपासून शहरी भागातील इयत्ता आठवी ते दहावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीची शाळा सुरू करणेबाबत या सूचना आहेत.

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यात कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

दिनांक १७ ऑगस्ट, २०२१ पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच दिनांक २ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

समितीन शाळा सुरू करण्या अगोदर खालील बाबींवर चर्चा करावी

शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहारत, गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा. शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, आयुक्त, महापालिका मुख्याधिकारी नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. करोना नियमांचे काटेकोर पालन करावे. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्ती जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच करोना चाचणी करून घेणे. तसेच, शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने बोलावण्यात यावे.

शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत सूचना

१. शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे – मुलांना सुरक्षित व आरोग्यदायी वातावरणात शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळेने विद्यार्थी, शिक्षक किंवा शिक्षकेततर कर्मचारी वर्ग आजारी पडल्यास त्यांचे अलगीकरण व त्यांच्यावर काय उपचार करावे? शाळा तात्पुरती बंद करावी लागल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी करावयाच्या उपाय योजना याचा कृती आराखडा तयार करावा. शाळेत मुलांनी यावे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीने चला मुलांनो शाळेत चला अशी मोहीम राबवावी, शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे. तापमापक, जंतूनाशक, साबण-पाणी इत्यादी वस्तुंची उपलब्धता तसेच, शाळेची स्वच्छता निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशानसानाने सुनिश्चित करावे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
जळगाव

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
Next Post

... म्हणून कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो ; सरकारचे संसदेत उत्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बदली झाल्यानंतर कार्यमुक्त, जाता-जाता पैशांचा मोह नडला ; महसूल सहायकास ३ हजाराची लाच घेताना पकडले !

June 1, 2023

जळगाव जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्टला मतदान ; ५ ऑगस्टला मतमोजणी ! 

July 3, 2022

अनिल देशमुखांवरील आरोपांची उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींकडून होणार चौकशी !

March 29, 2021

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, मंगळवार १ मार्च २०२२ !

March 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group