धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्याच्या युवा सेनेच्या तालुका संघटकपदी धरणगाव येथील युवा राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष तथा धरणगाव माजी उपनगराध्यक्ष गोविंद बापू कंखरे यांचे चिरंजीव संभाजी कंखरे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
शिवसेना (शिंदे गट) युवा उपजिल्हाप्रमुख भैयाभाऊ महाजन यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र संभाजी कंखरे यांना दिले आहे. त्यांच्या निवडीबद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील सर,युवानेते प्रतापराव पाटील, तालुका प्रमुख गजानननाना पाटील, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाप्रमुख मुकुंदभाऊ नन्नवरे, युवासेना शहर प्रमुख संतोष महाजन, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख विशाल महाजन, युवा तालुका प्रमुख दीपक भदाणे, तालुका संघटक हेमंतभाऊ चौधरी, उपतालुका प्रमुख संजयभाऊ चौधरी, कांतीलाल महाजन, धरणगाव शहर प्रमुख विलासभाऊ महाजन,नगरपालिका गटनेते पप्पूभाऊ भावे, शेतकरी सेना तालुका प्रमुख विनायक महाजन, शहर प्रमुख सत्यवान कंखरे, नानाभाऊ धनगर, धरणगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक पदाधिकारी यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.