जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासन संचलित जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव (भुसावळ) जिल्हा जळगाव येथील इयत्ता ६ वीच्या सन २०२१-२२ प्रवेशाकरीता होणारी निवड चाचणी बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१ रोजी नियोजित करण्यात आली आहे.
सर्व सबंधीत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, अध्यापक, पालक व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. तसेच सदर परिक्षेचे प्रवेशपत्र navodaya.gov.in या वेबसाईट वरुन डाउनलोड करुन घ्यावेत. अधिक माहितीकरीता ९४०४९००९१६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे, जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, भुसावळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.